
सासष्टी: मडगाव पालिकेतील रिक्त मुख्य कारकून पद भरण्यासाठी बोलावलेली पदोन्नती समितीची बैठक दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे नगरपालिकेत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही कागदपत्रांची गरज असल्याने ही बैठक पुढे ढकलल्याचे मडगाव नगरपालिका कचेरीतून सांगण्यात आले.
(atmosphere of doubt regarding clerk recruitment in Madgaon Municipality)
विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यातही हेच पद भरण्यासाठी बोलावलेली बैठक पुढे ढकलली होती. तेव्हा तेव्हा बाजार अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली; पण मुख्य कारकून पद रिक्तच राहिले. प्रिया नाईक यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त आहे.
माहिती गुप्त का ठेवली?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे पद अनुसूचित जमातीतील उमेदवार निवडून भरावे, असा शेरा अनुसूचित जमाती कल्याण खात्याने मारला आहे. नगरसेवक कामिलो बार्रेटो यांच्या मते, हे पद भरून आदिवासी जमातीच्या उमेदवाराला न्याय मिळावा. या पदासाठी अनुसूचित जमातीतील कोण उमेदवार पात्र आहे, याची माहिती मात्र गुप्त ठेवण्यात आल्याचे समजते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.