ATS Officer Bribery Case : वरिष्ठ पोलिस अधिकारी चौकशीच्या घेऱ्यात; ईमलद्वारे समन्स जारी

एटीएस खंडणीवसुली प्रकरण
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

ATS Officer Bribery Case : मनी लॉँडरिंग व्यावसायिकाकडून खंडणीवसुलीसाठी गेलेल्या अतिरेकीविरोधी पथकातील (एटीएस) पाच पोलिस कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. ज्याच्याकडून ही खंडणी वसुली केली होती, त्याने माहिती दिली असली तरी तक्रार देण्यास तो राजी नाही.

चौकशीसाठी एटीएसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ईमेलद्वारे तर इतर पाचजणांना चौकशीस उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. त्यामुळे या खंडणी वसुली प्रकरणात गुन्हा नोंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Goa Police
MLA Disqualification Petition : सभापती पद हे संविधानिक पद, न्यायालय निर्देश देवू शकत नाही - तवडकर

प्राप्त माहितीनुसार या खंडणीवसुलीची चौकशी करत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांनी ज्याने ही व्हिडिओ क्लिप एका दिल्लीतील मंत्र्याला पाठवली त्याच्याशी संपर्क साधून ती मिळवली आहे. त्याआधारे त्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ही खंडणी मागण्यासाठी एटीएसचे ते पाच पोलिस कर्मचारी वरिष्ठांच्या सूचनेनुसारच गेले होते, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे चौकशी सावधगिरीने केली जात आहे. चौकशीत अडकलेल्यांनी त्यांच्या बचावासाठी राजकारण्यांकडे धाव घेतली आहे.

मनी लाँडरिंग व्यावसायिकाकडे १० लाखांची खंडणी मागून ७.५ लाखांवर सौदा झाला. त्यातील ५ लाख अधिकाऱ्याला तर इतरांनी प्रत्येकी ५० हजार घेतले.

एटीएसचा ससेमिरा टाळण्यासाठी त्या व्यावसायिकाने ही व्हिडिओ क्लिप पाठवली. मात्र, त्याने आता अंग काढून घेण्याचा प्रयत्न चालवल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिकारी रजेवर

या प्रकरणात ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशीस ईमेलद्वारे समन्स बजावले आहे, तो गेल्या सोमवारपासून (२० फेब्रुवारी) आठवड्याच्या आजारी रजेवर गेला आहे. अजून त्याने या ईमेल समन्सला उत्तर दिलेले नसले, तरी त्याला ड्युटीवर सोमवारी हजर झाल्यावर उत्तर द्यावे लागणार आहे.

त्यांनी सोडला सुटकेचा सुस्कारा !

एटीएस पथकातील काही पोलिस कोणतीही नोटीस न देता गोव्यातील व्यावसायिक आस्थापनांमध्ये अतिरेक्यांशी संंबंध असल्याच्या नावाखाली घुसत आहेत.

या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याने या पथकाकडून खंडणीवसुली होत असलेल्या काही व्यावसायिकांनी सुस्कारा सोडला आहे. काही कॅसिनोमध्येही असे प्रकार या पथकाकडून होत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांमध्येच बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com