'काँग्रेस मेळाव्यादरम्यान वीज पुरवठा खंडित करण्याचा अयशस्वी प्रयत्न'

काँग्रेसच्या (Congress) मेळाव्यावेळी वीज पुरवठा खंडित करून मेळाव्यात विघ्न आणण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. अशी माहिती काँग्रेसचे डिचोलीतील कार्यकर्ते मेघ:श्याम राऊत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली
'काँग्रेस मेळाव्यादरम्यान वीज पुरवठा खंडित करण्याचा अयशस्वी प्रयत्न'
Congress WorkersDainik Gomantak

डिचोली: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम (Former Union Finance Minister P. Chidambaram) यांच्या उपस्थितीत गेल्या रविवारी साळ येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यावेळी वीज पुरवठा खंडित करून मेळाव्यात विघ्न आणण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. अशी माहिती काँग्रेसचे डिचोलीतील (Bicholim) कार्यकर्ते मेघ:श्याम राऊत यांनी पत्रकार परिषदेत देऊन या कृत्यामागे एखाद्या असंतुष्ट विरोधकाचा हात असावा. असा संशय त्यांनी व्यक्त केला. वीज खात्याने वेळीच तत्परता दाखवून वीज पुरवठा सुरळीत केल्याने विरोधकांचा हा डाव फसला. आणि मेळावा यशस्वी झाला. असेही श्री. राऊत म्हणाले. तर काँग्रेसचे कार्य पाहून विरोधकांनी धास्ती घेतली आहे. त्यातूनच वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न झाला. असे प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नझीर बेग (Nazir Beg) यांनी म्हटले आहे. डिचोलीत घेतलेल्या या परिषदेवेळी डिचोली तालुका गट समितीचे अध्यक्ष अर्जुन परब आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मारिया (झेनेट) सोझा उपस्थित होत्या.

Congress Workers
'जगप्रसिद्ध टिटोज क्लब विक्रीच्या बातम्या बिनबुडाच्या': रिकार्डो डिसौझा

ट्रान्सफॉर्मरचे फ्यूज काढले

काँग्रेसचे नेते तथा गोव्याचे मुख्य निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम आणि गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या उपस्थितीत रविवारी साळ येथील 'फार्म-33' येथे काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र दुपारी 2 वाजल्यापासून परिसरातील वीज प्रवाह बंद झाला. बराचवेळ विजेचा पत्ता नसल्याने वीज खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी दोश शोधण्याचा प्रयत्न केला असता, तेथील ट्रान्सफॉर्मरचे सहाही फ्यूज गायब होते. त्यानंतर वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्पूरती व्यवस्था करून वीज पुरवठा सुरळीत केला. अशी माहिती मेघ:श्याम राऊत यांनी दिली. याप्रकाराचा त्यांनी निषेध करतानाच पुन्हा आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या असंतुष्ट नेत्याचा यात हात असण्याची शक्यता वर्तविली आहे.

'म्हारगायेचो जागोर'

भाजप सरकारचे (BJP Government) अपयश आणि वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसने सुरु केलेल्या अभियानांतर्गत आता शुक्रवारी डिचोलीत 'म्हारगायेचो जागोर' करण्यात येणार आहे. सकाळी 10 वा. बाजारातील गणपती पूजन मंडपाकडून या जागोराला सुरवात होणार आहे. पूर्वनियोजनाप्रमाणे हे आंदोलन गुरुवारी नियोजित करण्यात आले होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव आंदोलन एक दिवस पुढे ढकलावे लागले. असे मेघ:श्याम राऊत यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com