मोपा नदीवर बंधारे टाकून,पाणी वळवण्याचा प्रयत्न

लोकांनी मांडली कैफियत
मोपा नदीवर बंधारे टाकून,पाणी वळवण्याचा प्रयत्न
Mopa River WaterDainik Gomantak

मोरजी: पेडणे तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. त्यातच कडशी मोपा नदीवर बंधारे टाकून पाणी वळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. सरकारने अगोदर शेतकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा करावा, पाणी राहिले तरच ते इतर उद्योगांना द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तालुक्यात काही प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यांना अगोदर पाण्याची व्यवस्था सरकारने करायला हवी होती. ती का केली नाही, असा प्रश्‍न येथील स्थानिक उदय महाले व उमेश गाड यांनी उपस्थित केला.

Mopa River Water
पुढील 5 वर्षांत धावणार 1200 इलेक्‍ट्रिक बसेस: माविन गुदिन्हो

सरकारच्या जलसिंचन खात्यांतर्गत नद्यांवर बंधारे टाकून पाणी वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिळारी प्रकल्पाचे पाणी मांद्रे मतदारसंघात नेण्यासाठी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी धारगळ येथे पंपहाऊस बांधला होता. ते पाणी पुढे याच दिशेने अजूनपर्यंत देण्याची प्रक्रिया का थांबली, असा प्रश्‍न स्थानिकांनी उपस्थित केला.

मांद्रे मतदारसंघ आणि पेडणे मतदारसंघातून नळाचे पाणी चांदेल प्रकल्पातून येते. ते अनियमित असल्याने किमान 30 एमएलडी पाण्याची सध्या पेडणेवासीयांना गरज असताना केवळ 15 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. हा प्रकल्प आणि त्याची क्षमता वाढवण्यासाठी आजपर्यंतच्या मंत्री-मुख्यमंत्र्यांनी का प्रयत्न केले नाहीत, असा सवाल माजी नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू यांनी उपस्थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.