कार्यकर्त्यांना भाजपमधून फोडण्याचा प्रयत्न: सुभाष फळदेसाई

सांगे मतदारसंघातील माझ्या कार्यकर्त्यांनी निःस्वार्थपणे काम केल्याने सांगेतून माझा विजय झाला.
कार्यकर्त्यांना भाजपमधून फोडण्याचा प्रयत्न: सुभाष फळदेसाई
Subhash PhaldesaiDainik Gomantak

केपे: सांगे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांना विरोधकांकडून अनेक आमिषे दाखवण्यात आली, त्यांना भाजपमधून फोडण्याचा प्रयत्न झाला, पण निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ते आपल्याकडे खेचू शकले नाहीत, असे उपसभापती तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. सांगे मतदारसंघातील माझ्या कार्यकर्त्यांनी निःस्वार्थपणे काम केल्याने सांगेतून माझा विजय झाला. त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी असेन, असेही त्यांनी सांगितले. मळकर्णे येथे भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते

Subhash Phaldesai
गुढी पाडव्यानिमित्त केप्यात भव्य फेरी

यावेळी सरपंच राजश्री गावकर, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. सांगे मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असून तो आमच्या कार्यकर्त्यांनी समर्थपणे राखला याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या सहकार्यामुळेच आज मी या पदावर पोहचलो, असेही त्यांनी सांगितले.

विरोधकांच्या अश्वासनांना बळी पडून काही आमचे कार्यकर्ते बाजूला गेले आहेत. ते जर परत येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. पण ज्या काही मोजक्याच लोकांनी पक्षाला हानी पोहचविण्याचा तसेच माझा पाडाव करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन काम केले, त्यांना या पक्षात परत घेऊ नये, असे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com