यंदाच्या निवडणुकीत महिलांची आघाडी, उमेदवारांचे आरक्षित प्रभागाकडे लक्ष

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

मडगाव पालिका निवडणुकीत यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे चित्र दिसत असून आता पासून काही महिला उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.

नावेली : मडगाव पालिका निवडणुकीत यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे चित्र दिसत असून आता पासून काही महिला उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. काही महिला उमेदवार पालिका निवडणुकीसाठी कोणते प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या पालिका निवडणुकीत पुरुष उमेदवारांसाठी राखीव प्रभाग यावेळी महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील अशी शक्यता काही महिलाउमेदवारां कडून व्यक्त केली जात असून काही महिला उमेदवार प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुरवात केली आहे.

सध्या दिवाळी निमित्त काही उमेदवार प्रभागात मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडिया व्हाॅटस अॅप व फेसबुकचा वापर करीत आहेत.
मडगावात नविन महिला उमेदवार तसेच आजी माजी महिला नगरसेवक यावेळी निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.काही महिला नगरसेवक आपल्या प्रभागातून निवडणूक लढविण्यास न मिळाल्यास शेजारच्या प्रभातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

यावेळी जास्तीत जास्त महिला उमेदवार निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत परंतु प्रभागातील कोणत्या कामांना प्राधान्य देणार हे संभाव्य उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. अनेक महिला नगरसेवकांनी पालिकेत चांगली कामगिरी केली असून या माजी नगरसेविका निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

संबंधित बातम्या