अधिकाऱ्यांची मनमानी नडली!

प्रतिनिधी
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

कारागृहामध्ये तेथील अधिकाऱ्यांनी कथित मनमानी कारभार चालविला आहे. आपल्या मर्जीतील काही तुरुंगरक्षकांना कारागृहातील ड्युटीवेळी मोबाईल आत घेऊन जाण्यास परवानगी दिली जात आहे.

पणजी: कारागृहामध्ये तेथील अधिकाऱ्यांनी कथित मनमानी कारभार चालविला आहे. आपल्या मर्जीतील काही तुरुंगरक्षकांना कारागृहातील ड्युटीवेळी मोबाईल आत घेऊन जाण्यास परवानगी दिली जात आहे. त्याचा गैरफायदा हे तुरुंगरक्षक उठवत आहेत. कच्च्या कैद्यांना मोबाईलचा वापर करण्यास तुरुंगरक्षक देत असल्याने कारागृहात राहूनही हे कच्चे कैदी साथीदारांशी संपर्क साधत असतात. त्यामुळे काही तुरुंग कर्मचाऱ्यांचा कैद्यांशी संगनमत असल्याचा संशयही कारागृहाच्या आराखड्याची तपासणी केल्यानंतर समोर आले आहे. 

सुरक्षारक्षकांचे कैद्यांबरोबर हितसंबंध?
कारागृहात कैद्यांच्या गटामध्ये हाणामारी होऊन खुनाच्या घटनाही घडल्या आहेत. गुन्ह्यामध्ये कारागृहात असलेल्या एका संशयिताने एखाद्या हिंदी चित्रपटातील स्टाईलने दबंगगिरीचा व्हिडिओ काढला होता व त्याचे कारागृहातही वर्चस्व असल्याचे दाखवून दिले होते. तुरुंग कर्मचाऱ्यांनी कैद्यांना नियंत्रणात ठेवण्याऐवजी कारागृहातील कैद्यांना हे तुरुंग कर्मचारी घाबरूनच असतात. काहीजणांची कैद्यांशी जवळीक होते व त्यातून या कैद्यांचे चोचले पुरविण्याचे कामही काही तुरुंगरक्षक करतात. अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारागृहात छापा टाकल्यावर कैद्यांच्या खोल्यांमध्ये तसेच अंथरूणामध्ये मोबाईल संच किंवा सीमकार्ड सापडलेले आहेत. हे मोबाईल संच तसेच सीमकार्ड तुरुंगरक्षक त्‍या कैद्यांपर्यंत पोहोचवण्याच्या घटना आढळून आल्या आहेत. त्यामुळे काही तुरुंग अधिकाऱ्यांची कारागृहातील ड्युटी बदलून मुख्यालयात लावण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या तुरुंगरक्षकांना कार्यालयाबाहेर बसवण्यात आले आहे. यावरून कारागृहातील तुरुंग कर्मचारीच कैद्यांच्या पलायनामध्ये गुंतलेले असावेत, असा संशय बळावत आहे. 

संबंधित बातम्या