दामोदर नाईक यांना उत्कृष्ट सहकार कार्यकता पुरस्कार

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

उत्कृष्ट सहकार कार्यकर्ता पुरस्कार प्रियोळ - म्हार्दोळ येथील दामोदर नाईक यांना जाहीर झाला आहे, तर उत्कृष्ट संस्था म्हणून भंडारी सहकारी पतपुरवठा संस्थेला पुरस्कार जाहीर झाला आहे.

पणजी: येत्या १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्यानिमित्त गोवा राज्य सहकार संघाने आज सहकार पुरस्कारांची घोषणा केली. उत्कृष्ट सहकार कार्यकर्ता पुरस्कार प्रियोळ - म्हार्दोळ येथील दामोदर नाईक यांना जाहीर झाला आहे, तर उत्कृष्ट संस्था म्हणून भंडारी सहकारी पतपुरवठा संस्थेला पुरस्कार जाहीर झाला आहे.

संघाचे अध्यक्ष उदय प्रभू यांनी ही माहिती दिली आहे. संघ हा राज्यातील सहकार क्षेत्रातील संस्थांची शिखर संस्था आहे. सहकार सप्ताह ते दरवर्षी या संस्थांच्या सहकार्याने साजरा करतात. या दरम्यान ते सहकार पुरस्कारांचेही वितरण करतात. कोविड महामारीत आत्मनिर्भर भारत सहकार अशी संकल्पना यंदासाठी संघाने सहकार सप्ताहाच्या निमित्ताने निवडली आहे.

इतर पुरस्कार असे - उत्कृष्ट अध्यक्ष - दत्तात्रय नाईक, जी. व्ही. एम. कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडा. उत्कृष्ट सचिव - लीना शिरोडकर, नावेली विकास सेवा सोसायटी, नावेली साखळी. उत्तेजनार्थ पुरस्कार - श्री माऊली दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादीत, विर्नोडा. शिखर बॅंक कर्मचारी सहकारी पतसंस्था, पाटो - पणजी. मल्लिकार्जुन सहकारी दूध व्यावसायिक संस्था, भाटी  सांगे.

संबंधित बातम्या