कोरोनाविषयी तिसवाडी तालुक्यात ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

जेनिफर मोन्सेरात म्हणाल्या, की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पुढाकारामुळे ही जागृती मोहीम राबविण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्यासाठी लोकजागृती महत्त्वाची आहे.

पणजी: तिसवाडी तालुक्यातील जनतेला कोरोनाविषयी कशी काळजी घ्यावी, याची साध्या आणि सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे. आठवडाभर सुरवातीला जनतेमध्ये जागृती करणार आहोत. या जागृतीद्वारे सकारात्मक परिणाम दिसून यावा आणि तालुक्यातील रुग्णांची संख्या कमी व्हावी, अशी आशा आहे. जर आवश्‍यकता भासल्यास आणखी काही दिवस अशाप्रकारे जागृती सुरू राहील, अशी माहिती महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी दिली.

 

आज सकाळी ताळगाव येथे या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार आन्तानियो तथा टोनी फर्नांडिस, महापौर उदय मडकईकर, उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई, ताळगावचे सरपंच आग्नेल डिकुन्हा यांची उपस्थिती होती.

 

याप्रसंगी मोन्सेरात म्हणाल्या, की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पुढाकारामुळे ही जागृती मोहीम राबविण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्यासाठी लोकजागृती महत्त्वाची आहे. आमदार फर्नांडिस म्हणाले की, जनतेला सहज आणि सोप्या भाषेत कोरोनाविषयी काय काळजी घ्यावी हे ध्वनिक्षेपकावरून सांगण्यात येणार आहे. संपूर्ण तिसवाडी तालुक्यात हे वाहन फिरणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री सावंत आणि महसूलमंत्री मोन्सेरात यांच्या मदतीने ही जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. महापौर मडकईकर म्हणाले की, दिवसेंदिवस पणजी शहर परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या