महागाई विरोधात काँग्रेसचे डिचोलीत जनजागृती अभियान

भाजप सरकारचे (BJP Government) अपयश आणि वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसच्या (Congress) जनजागृती अभियानला उद्यापासून सुरवात होत आहे.
महागाई विरोधात काँग्रेसचे डिचोलीत जनजागृती अभियान
CongressDainik Gomantak

डिचोली: भाजप सरकारचे (BJP Government) अपयश आणि वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसच्या (Congress) जनजागृती अभियानला उद्यापासून सुरवात होत आहे. या अभियानांतर्गत उद्या गुरुवारी सायंकाळी 5 वा. डिचोलीत जनजागृती करण्यात येणार आहे. डिचोलीतील (Bicholim) या जनजागृती अभियानात काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप (Union Minister Adv. Ramakant Khalap) सहभागी होणार आहेत. डिचोली बाजारातून या अभियानचा प्रारंभ होणार आहे. अशी माहिती डिचोली तालुका गट समितीचे अध्यक्ष अर्जुन (नितीन) परब आणि मतदारसंघातील काँग्रेसचे नेते मेघ:श्याम राऊत यांनी बुधवारी (ता. 17) सायंकाळी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डिचोली गट महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मारिया (झेनेट) सौझा आणि प्रदेश समितीचे नझीर बेग उपस्थित होते.

Congress
चर्चिल आणि वालांका लवकरच तृणमूलवासी

परिवर्तनाची गरज

भाजप सरकार सर्वबाबतीत अपयशी ठरले आहे. महागाईने तर सामान्य जनतेला जीणं असह्य झाले आहे. डिचोलीतील मतदारांनी भाजपला संधी दिली. मात्र स्थानिक आमदार आणि भाजप डिचोलीवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ ठरले आहेत. रोजगारीची समस्या सोडवण्यास आणि विकासाच्या बाबतीत भाजप पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेची फसवणूक करण्यापलीकडे भाजपने काहीच केलेले नाही. अशी टीका मेघ:श्याम राऊत यांनी केली. केवळ डिचोलीतच नव्हे, तर राज्यात आणि केंद्रात परिवर्तन होणे आवश्यक आहे. असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या उद्याच्या अभियानात काँग्रेस नेते ऍड. खलप भाजप सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणार आहेत. अशी माहितीही श्री. राऊत यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com