डिचोलीत महागाई विरोधात काँग्रेसचा 'जागोर'

काँग्रेसचे (Congress) 'म्हारगायेचो जागोर' अभियान डिचोलीत पोचले असून, आजपासून डिचोलीत या अभियानला सुरवात झाली आहे.
डिचोलीत महागाई विरोधात काँग्रेसचा 'जागोर'
CongressDainik Gomantak

डिचोली: काँग्रेसचे (Congress) 'म्हारगायेचो जागोर' अभियान डिचोलीत पोचले असून, आजपासून डिचोलीत (Bicholim) या अभियानला सुरवात झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप (Ramakant Khalap) यांच्या उपस्थितीत भाजप सरकार विरोधात घोषणा देत, डिचोली बाजारातून या अभियानला प्रारंभ झाला. यावेळी काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके, प्रदेश समितीचे नझीर बेग, डिचोली गट काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन परब (Arjuna Parab), डिचोली महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मारिया सोझा (जेनेट) आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी बाजारातील व्यापाऱ्यांची भेट घेऊन, भाजप सरकारचे अपयश आणि वाढत्या महागाईबाबत जनजागृती केली. व्यापाऱ्यांना पत्रके वितरीत करतानाच, येत्या निवडणुकीत काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन केले.

Congress
गोव्याला गुजरात,बंगाल मॉडेल नाही तर 'गोवा मॉडेल' हवंय: लुईझिन फालेरो

अच्छे दिन कुठे गेले?

अच्छे दिनची घोषणा करणाऱ्या भाजप सरकारच्या कार्यकाळात महागाईने कळस गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून या सरकारने सर्वसामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. अशी टीका ऍड. रमाकांत खलप यांनी केली. जनतेने भाजप सरकारला सत्तेपासून दूर करून समृद्ध गोव्यासाठी येत्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेवर आणावे. असे आवाहन केले. यावेळी ऍड. खलप यांनी काँग्रेसचा पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला. विजय भिके, मेघ:श्याम राऊत आणि मारिया सोझा यांनी यावेळी मत मांडले. सरकारने सर्व बाजूनी जनतेला वेठीस धरले आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढवून सर्वसामान्य जनतेला जीणं असह्य करून सोडले आहे. अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, हे अभियान संपूर्ण डिचोली मतदारसंघात राबविण्यात येणार असल्याचे अर्जुन (नितीन) परब यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com