फोंडा नगरपालिकेद्वारे सुरक्षित खाण्यासाठी "ईट सेफ" उत्पादनाची जनजागृती

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

भाजीपाल्यावर असलेले कीटकनाशक ईट सेफ वापरल्याने नष्ट होणार आहे. त्यामुळे खाण्यासाठी भाज्या तसेच इतर वस्तू सुरक्षित राहणार असल्याने लोकांना कोणताही धोका पोचणार नाही. 

फोंडा; बंगलोर येथील बीएएसएलई नॉवेशन प्रा. लि. या कंपनीकडून कृषितंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या "ईट सेफ'' हे नवीन उत्पादन गोव्यातील बाजारपेठेत दाखल झाले असून या उत्पादनाचे उद्‌घाटन फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष विश्‍वनाथ दळवी यांच्या हस्ते मिनिनो ट्रेड सेंट्रलच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी कंपनीचे कार्यकारी संचालक एम शंकर, संचालक संदीप वेटे, गोव्याचे प्रमुख वितरक रितेश नाईक, वितरक उगम पार्सेकर आदी उपस्थित होते.

नगराध्यक्ष विश्‍वनाथ दळवी यांनी सांगितले की, आपल्या दैनंदिन जीवनात ईट सेफचा वापर करायला मिळणार असून उत्पादनाच्या माध्यमातून वापरात येणाऱ्या भाजीपाल्यावर असलेले कीटकनाशक ईट सेफ वापरल्याने नष्ट होणार आहे. त्यामुळे खाण्यासाठी भाज्या तसेच इतर वस्तू सुरक्षित राहणार असल्याने लोकांना कोणताही धोका पोचणार नाही. 

फोंडा पालिकेतर्फे यासंबंधी जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कंपनीचे कार्यकारी संचालक एम शंकर यांनी कृषी केंद्रीय खत पध्दतीने तयार केलेले हे उत्पादन असून याचा पुरेपूर लाभ लोकांनी घ्यावा असे आवाहन केले. संदीप वेटे यांनी या नवीन उत्पादनाविषयी माहिती दिली. दैनंदिन जीवनात वापरात येणारे भाज्या व मासे तसेच इतर धान्यावरील कीटकनाशक ईट सेफ वापरल्यानंतर नष्ट होत असल्याने फॉर्मेलीनपासूनही मासे सुरक्षित होऊ शकतात, असे यावेळी सांगण्यात आले.उगम पार्सेकर यांनी या उत्पादनाविषयी थोडक्‍यात माहिती देऊन जनरल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स यांच्याकडे उपलब्ध असेल, असे सांगितले.

संबंधित बातम्या