वळपई आठवडा बाजारात नागरिक विसरले सामाजिक अंतराचे  भान 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 27 एप्रिल 2021

राज्यात कोरोना बंधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याने राज्य सरकार राज्यात लॉकडाऊन लावण्याची विचारात आहेत.  मात्र राज्यातील नागरिकांना आपल्या आरोग्याची कसलीच पर्वा नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे.

वळपई : राज्यात कोरोना बंधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याने राज्य सरकार राज्यात लॉकडाऊन लावण्याची विचारात आहेत.  मात्र राज्यातील नागरिकांना आपल्या आरोग्याची कसलीच पर्वा नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे. वाळपईचा आजचा आठवडा बाजारात असेच चित्र दिसून आले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे माहिती असूनही नागरिकांनी आज आठवडा बाजारात गर्दी केली होती. बाजारात गर्दी झाल्याचे लक्षात येताच सरकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना समाजिक अंतराचे भान राखण्याच्या सूचना दिल्या. मात्र कोणीही ऐकण्याच्या तयारीत नसल्याचे दिसून आले. (Awareness of the social gap forgotten by the citizens in the Valpai Week market) 

तरुण तेजपाल प्रकरणाचा निकाल १२ मे पर्यंत तहकूब

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 2321 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एक दिवसांत कोरोनाने 38 जननी प्राण गमावले आहेत. कोरोनाने राज्यात मृत्यूचा आकडा  वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. याशिवाय कोरोनाचा  प्रसार रोखण्यासाठी लोकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन करत असताना वळपईच्या आठवडा बाजारात मात्र पूर्णपणे याउलट चित्र पहायला मिळत आहे. 

गोवा: दिवसभरात 2321 नवे कोरोना बाधित, 38 जणांचा मृत्यू

दरम्यान, राज्यातील परिस्थिती चिंताजनक होत असल्याचे पाहून राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत बैठक घेऊन कोरोनाकहा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही लॉकडाऊन लावण्याबाबत सूचना करणार असल्याचे मंत्री राणे यांनी म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्याने कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली, त्यामुळे आता राज्यातही लॉकडाऊन करणे गरजेचे झाले असल्याचे विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले आहे.  

संबंधित बातम्या