आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

दिल्ली येथील डॉक्टर मंत्री नाईक यांना दिल्या जाणाऱ्या उपचाराबाबतीत समाधानी आहेत. मंत्री नाईक यांना बरे होण्यास थोडा वेळ लागणार असल्याचेही ते म्हणाले.

पणजी: केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती सुधारली असून त्यांना दिल्ली येथे उपचारासाठी नेण्याची गरज नसल्याची माहिती मणिपालचे डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

दिल्ली येथील ‘एम्स’मधून आलेल्या डॉक्टरांच्‍या पथकाने श्री. नाईक यांना तपासले आणि त्यांच्यावर सुरू असणाऱ्या उपचारांचीही माहिती घेतली. दिल्ली येथील डॉक्टर मंत्री नाईक यांना दिल्या जाणाऱ्या उपचाराबाबतीत समाधानी आहेत. मंत्री नाईक यांना बरे होण्यास थोडा वेळ लागणार असल्याचेही ते म्हणाले.

मंत्री श्रीपाद नाईक हे गेल्या काही दिवसांपासून मणिपाल रुग्णालयात कोरोनावरील उपचार घेत आहेत. १२ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्‍याची माहिती त्यांनी स्वतःच्या ट्विटरच्या खात्यावरून दिली होती. त्यानंतर ते त्यांच्या घरीच क्वारंटाईन होते. मात्र, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे निर्माण होऊ लागल्याने त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीही करण्यात आली होती. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या