‘बाबू आजगावकर गो बॅक!’मोप विमानतळ राष्ट्रीय महामार्गासाठी ग्रामस्थांचा विरोध

Babu Azgavkar Go Back Dhargal villages oppose Mopa Airport National Highway
Babu Azgavkar Go Back Dhargal villages oppose Mopa Airport National Highway

पेडणे : दाडाचीवाडी - धारगळ येथे मोप विमानतळ राष्ट्रीय महामार्गासाठी विरोध दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांनी कालरात्री उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे एक कार्यक्रम आटोपून परत जात असताना शेतकऱ्यांनी निदर्शने करून त्यांना ‘काळे बावटे’ दाखविले. यावेळी निदर्शकांच्या हातात ‘आमच्या जमिनी वाचवा, आमच्या जमिनी आम्ही देणार नाहीत’, ‘एक दो एक दो गोवा सरकार फेक दो’, ‘आजगावकर शेतकऱ्यांना पाठिंबा द्या, गोवा सरकार मुर्दाबाद’, ‘बाबू आजगावकर गो बॅक’ अशा जोरदार घोषणा दिल्या. तसेच घोषणा लिहिलेले फलक त्यांच्या हातात होते. धारगळ येथील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना आंदोलनकर्ते काळे बावटे दाखवणार याची माहिती मिळाल्याने संकेत मिळाले होते.

त्‍याबाबत आजगावकर म्हणाले की, ‘काळे बावटे दाखवून जर प्रश्न सुटत असतील तर दुप्पटपणे काळे बावटे दाखवा’. त्यानंतर मंत्री आजगावकर यांच्यासाठी एस्कॉर्ट करणारी पोलिसांची जीप नाक्यावर डाव्या बाजूने गेली तर उजव्या बाजूने मंत्री आजगावकर हे गाडीतून निघाले. यामुळे आंदोलनकर्त्यांची फसगत झाली व मंत्री आडमार्गाने मार्गस्थ झाले. काळे बावटे दाखविण्‍यात आल्‍याने लोकांमध्‍ये चर्चा रंगली होती. त्‍यामुळे आंदोलक पुढील काय कृती करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com