
सासष्टी : मठग्रामस्थ हिंदू सभेचे माजी अध्यक्ष, माजी उद्योगमंत्री, श्री दामोदर विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक कै. अनंत उर्फ बाबू नरसिंह नायक यांची 95 वी जयंती विविध उपक्रमांनिशी साजरी करण्यात आली.
समारंभाला मडगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा उद्योजक दीप कारापूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर सभेचे अध्यक्ष भाई नायक, शिक्षण सल्लागार अनिल पै, व्यवस्थापनाच्या प्रशासक रिमा कुंदे, प्राचार्य राजीव देसाई, मुख्याध्यापक केशव नायक, स्पर्धांचे परीक्षक गौतम गावडे, सिद्धेश पोखरे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाबू नायक यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. नंतर नूतन ग्रंथालय कक्ष, संगणक कक्षाचे उदघाटन करण्यात आले. जयंतीनिमित्त श्री दामोदर विज्ञान उच्च माध्यमिकतर्फे अखिल गोवा उच्च माध्यमिक पातळीवर कोकणी व मराठी एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उदघाटन दीप कारापूरकर यांनी दीप प्रज्वलीत करून केले.
याप्रसंगी अनिल पै यांनी बाबू नायक यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. प्राचार्य राजीव देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. परीक्षक गौतम गावडे यांनी एकपात्री अभिनयाची वैशिष्ट्ये व निरीक्षण यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आणि आभार शिक्षिका परिणिता पोरोब यांनी केले.
अभिनय स्पर्धेचा निकाल
कोकणी गट : पहिले - प्रसिद्धी रायकर (जीव्हीएम), दुसरे - स्वस्तिक नाईक (एस. एस. आंगले), तिसरे - प्रजल नाईक (मडकईकर, जुने गोवे), उत्तेजनार्थ - ईशा नाईक (आदर्श विद्याप्रसारक, वजनगाळ), सुश्मिता सिंग (श्री सरस्वती, कवळे).
मराठी गट : पहिले - गौतमी देसाई (पुरुषोत्तम वालावलीकर), दुसरे - भूमी धुरी (एस. एस. आंगले), तिसरे रुचा दळवी (डॉ. के. ब. हेडगेवार), उत्तेजनार्थ - हर्ष सामंत (पीईएस), स्वरांगी नाईक (बलराम).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.