'बाळा'च्या अपहरणकर्त्यांना मुंबईतून आणले गोव्यात

रवानगी पोलिस कोठडीत: चिमुकल्याला सोपविले मातेकडे
'बाळा'च्या अपहरणकर्त्यांना मुंबईतून आणले गोव्यात
Vasco PoliceDainik Gomantak

वास्को: मातेच्या कुशीतील अकरा महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या दीपक यादव ऊर्फ लंगडा व प्रमिला (कानी) या दोघा अपहरणकर्त्यांना घेऊन वास्को पोलिस शनिवारी पहाटे मुंबईहून वास्कोला पोहोचले. त्या बाळाला आईच्या स्वाधीन केल्यावर ते बाळ आईच्‍या कुशीत विसावले. त्या दोघा अपहरणकर्त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीचा रिमांड देण्यात आला आहे.

आपल्या अकरा महिन्याच्या बाळाचे 11 मेच्‍या पहाटे अपहरण झाल्याची तक्रार महिलेने गुरुवारी (ता. 12) केली होती. आपल्या बाळाचे अपहरण दीपक यादव ऊर्फ लंगडा तसेच प्रमिला (कानी) यांनीच केले असावे असा संशय बाळाच्या आईने व्‍यक्त केला होता. लंगडा व कानी हे बुधवारपासून बेपत्ता असल्याने त्यांच्यावर संशय बळावला होता.

Vasco Police
खरी कुजबुज... बाबू कवळेकरांचे लक्ष आता लोकसभेवर?

वास्कोचे प्रभारी आनंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली सचिन बांदेकर, आशिष नाईक, सनील बावळेकर, महिला पोलिस रवीना शहापूरकर याचा समावेश असलेले पथक मुंबईला निघाले. तेथे सदर लंगडा व कानी हे माहीम येथे असल्याचे समजले. त्यामुळे पायधुनी पोलिस स्थानकातील पोलिसांची मदत घेण्‍यात आली.

संशयित लंगडा भीक मागून पोट भरायचा

लंगडा गेली दोन-तीन वर्षे वास्कोत पदपथ व इतर ठिकाणी राहून भीक मागून उदरनिर्वाह करीत होता. त्यामुळे त्याला वास्को पोलिस ओळखत होते. तो त्या बाळाला घेऊन मुंबईला गेल्याचे उघडकीस आल्यावर वास्को पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. वास्को पोलिसांनी दिलेल्या वर्णनावरून मुंबई पोलिसांनी शोध घेण्यास आरंभ केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.