स्मार्ट सिटी असलेल्या पणजीतील रस्त्यांची दुरावस्था

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

कोणत्याही राज्याची राजधानी ही त्या राज्याची शान असते. परंतु पणजीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. राजधानी पणजी स्मार्ट आहे किंवा होणार अशा पद्धतीच्या केवळ गप्पा मारल्या जात आहेत.

पणजी : कोणत्याही राज्याची राजधानी ही त्या राज्याची शान असते. परंतु पणजीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. राजधानी पणजी स्मार्ट आहे किंवा होणार अशा पद्धतीच्या केवळ गप्पा मारल्या जात आहेत. कारण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. पणजीतील खड्ड्यांचा त्रासही वाहन चालकांना होत आहे. पावसाळा आला आणि गेला तरी राजधानी पणजीतील खड्ड्यांचा त्रास कमी होण्याऐवजी अधिकच वाढला आहे. 

१८ जून रस्त्यासह राजधानीतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट स्थितीतील आहे. रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांच्या आत जे हलक्या प्रतीचे सिमेंट-खडी ओतण्यात आली होती. खडीमुळे वाहन स्लिप होण्याचा धोका असतो. सांतिनेझ परिसरात असणारे खड्डे खूप खोलवर आहेत. शिवाय या परिसरात काही ठिकाणी लाइटही नाही. त्यामुळे रात्री दुचाकी वाहनांना अधिक त्रास होतो. चारचाकी वाहने हाताळताना कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी दुचाकी स्वार गाडीवरून पडल्याच्या घटनांची नोंद यापूर्वीही झाली आहे. राज्यातील पदपथांची अवस्थासुद्धा रस्त्यांसारखीच आहे. अनेक ठिकाणी पदपथ असूनही त्यांचा काही उपयोग नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काही ठिकाणी मद्यपानासाठी या पदपथांचा वापर केला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून गोव्यात रस्ता अपघातांत लक्षणीय वाढ झालेली असून वर्ष २०१९ मध्ये तब्बल २९७ व्यक्तींचा रस्ता अपघातांत मृत्यू झाल्याचे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. वर्ष २०१९ मध्ये सरासारी प्रत्येकी तीस तासांत रस्ता अपघातांत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे त्याद्वारे सूचित होते. सप्टेंबर २०२० मध्ये गोव्यात १३ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाल्याच्या नोंदी वाहतूक संचालनालयाने प्रसृत केलेल्या अहवालात आहेत.

अधिक वाचा :

गोव्यातील जीवरक्षकांचा उद्यापासून बेमुदत संपचा इशारा.

भारताीय संविधान स्थापनादिनी गोमंतकीय साहित्यिक आणि दलित समाजातील अग्रणी नेत्याचे निधन

 
 

संबंधित बातम्या