Margao: खराब रस्तेच जीवघेण्या अपघातांचे मुख्य कारण - युरी आलेमाव

सर्वसमावेशक गुणवत्ता नियंत्रण आणि देखरेख प्रणालीचा अभाव
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

मडगाव: अयशस्वी, असंवेदनशील आणि बेजबाबदार भाजप सरकारने गोव्यातील जीवघेण्या अपघातांना जनतेला जबाबदार धरणे थांबवावे. सर्वसमावेशक गुणवत्ता नियंत्रण आणि देखरेख प्रणालीचा अभाव गोव्यातील खराब रस्ते (Bad roads in Goa) आणि जीवघेण्या अपघातांचे मुख्य कारण आहे, असे कुंकळ्ळीचे आमदार आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव (MLA Yuri Alemao) यांनी म्हटले आहे.

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे हे अपघातांचे प्रमुख कारण असल्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांच्या विधानावर तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल (Minister Nilesh Cabral) यांनी ओव्हरस्पीडिंग, ओव्हरटेकिंगच्या घटनांवर चोवीस तास देखरेख ठेवण्यासाठी सरकार खासगी कंपन्यांना कंत्राट देणार या केलेल्या घोषणेवर तसेच परिवहन मंत्री माविन गुदिन्हो (Minister Mavin Gudinho) यांनी दोनपेक्षा जास्त विभाग समान काम करत असल्याच्या केलेल्या उल्लेखावर प्रतिक्रीया देताना कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी गोव्यात योग्य रस्ते व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात भाजप सरकारच्या अपयशावर जोरदार टीका केली आहे.

Yuri Alemao
Verna : 15,480 रूपयांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त, वेर्णा पोलिसांची कारवाई

रस्ता बांधणे किंवा पूल बांधणे यासारख्या प्रकल्पामध्ये अनेक विभाग आणि एजन्सी गुंतलेल्या आहेत. दुर्दैवाने समन्वयासाठी आणि जबाबदारी आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. प्रत्येक अपयशावर इतरांकडे बोटे दाखवली जातात. या वृत्तीमुळे रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम होते तसेच वाहतुक सिग्नल व दिशादर्शक चिन्हांची कमतरता व अभाव यामुळे जीवघेण्या अपघातात निष्पापांचे प्राण जातात असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.

मी गेल्या विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना कामांवर देखरेख ठेवण्यासाठी, दर्जाची तपासणी करण्यासाठी आणि उत्तरदायित्वासह जबाबदारी निश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक योजना तयार करण्यास सांगितले होते. आता हा विषय सर्वोच्च प्राधान्याने घ्यावा आणि अधिक जीव गमावण्यापूर्वी योग्य यंत्रणा कार्यांवीत करावी अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

Yuri Alemao
Waste Problem: कचरा समस्या सोडविण्यासाठी समविचारींचे पॅनल निवडणुकीत

सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून हाती घेतलेल्या कोणत्याही नवीन प्रकल्पाला तीन ते सहा महिन्यांत गुणवत्तेचे प्रश्न का येतात हे तपासण्याची वेळ आली आहे. गुणवत्ता नियंत्रणात गंभीर त्रुटी आहेत. कोणावरही जबाबदारी नसल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्यातील भ्रष्ट डबल इंजिन भाजप सरकारच्या मिशन कमिशनमुळे गोव्यात महामार्ग तसेच पुलांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. गोव्यात पत्रादेवी ते काणकोण आणि मुरगाव ते मोलें रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे जवळजवळ प्रत्येक आठवड्यात जीवघेणे अपघात होत आहेत, असे युरी आलेमाव यांनी लक्षात आणुन दिले.

गोव्यात योग्य महामार्ग रस्ते आणि पूल बांधण्यात अपयशी ठरल्याबद्दल मेसर्स एमव्हीआर कन्स्ट्रक्शन्स आणि मेसर्स दिलीप बिल्डकॉन यांसारख्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात भाजप सरकार अयशस्वी ठरले ज्यामुळे शेकडो निष्पाप लोकांना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले आहेत.

मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि परिवहन मंत्री यांनी प्रशासन "भ्रष्टाचार मुक्त" करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सरकारी अधिकारी व विवीध विभागांमध्ये समन्वय साधुन कामाचा दर्जा व सुविधांची प्राथमिकता ठरवली पाहिजे. खासगी कंपनीना सदर काम देणे म्हणजे सरकारी तिजोरीवर अधिक भार पडणार असुन, भ्रष्टाचारास वाव मिळणार आहे असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com