बहारदार ‘घोष यात्रा’ नाट्यप्रयोग होणार ऑनलाईन प्रक्षेपित 

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

कलाकारांच्या अभिनयाने नटलेला दशावतार नाट्यप्रयोग ‘घोष यात्रा’ सोमवारी ९ रोजी संध्याकाळी सात वाजता दशावतार कलाकार समिती दोडामार्ग संचालित ‘जागर दशावताराचा’ या युट्यूब चॅनलवर ऑनलाईन प्रक्षेपित होणार आहे.

गुळेली : बहारदार अभिनयाने नटलेला ‘घोष यात्रा’ हा नाट्यप्रयोग सोमवारी ९ रोजी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन प्रक्षेपित होणार आहे.
कोकण कलेचे वैभव, कोकणचा बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांच्यासोबत दशावताराची शान हरी गावकर आणि मुरब्बी खलनायक गोमंतकीय दशावतारी कलाकार दामोदर (दामू) जोशी यांच्यासह दोडामार्ग दशावतार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला दशावतार नाट्यप्रयोग ‘घोष यात्रा’ सोमवारी ९ रोजी संध्याकाळी सात वाजता दशावतार कलाकार समिती दोडामार्ग संचालित ‘जागर दशावताराचा’ या युट्यूब चॅनलवर ऑनलाईन प्रक्षेपित होणार आहे.

या अगोदर सादर केलेल्या पाच नाट्यप्रयोगांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता  गोवा राज्यातील आणि दोडामार्ग तालुक्यातील निवडक नामवंत कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय आणि जुगलबंदी तसेच उत्कृष्ट संगीत साथ यांचा महामेळा म्हणजेच महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग घोषयात्रा या  नवीन दशावतारी नाटकापासून सुरूवात होत आहे ती पाहायला विसरू नका असे आवाहन दशावतारी कलाकारांच्या वतीने करण्यात आले आहे.

दुर्योधन - दामोदर जोशी, दुश्शासन - विलास गवस, शकुनी - कृष्णा कुंभार, धर्म - राजेंद्र बांदेकर, अर्जुन - हरिश्चंद्र गावकर, मालती- ओमप्रकाश चव्हाण, गंधर्व - अंकुश जाधव, इंद्र - सिद्धेश महाले, नारद - फटी गवस, कृष्ण - अभिमन्यू बांदेकर, रुक्मिणी - भास्कर सुतार, गारुडी - कृष्णा नाईक, नागीण - अजिंक्य गवस यांच्या भूमिका आहेत. तर संगीतसाथ हार्मोनियम - विशाल कांबळे, पखवाज - गीतेश कांबळे, झांज - सिद्धेश कदम यांनी केली आहे.
 

संबंधित बातम्या