लैंगिक छळप्रकरणी आयकरच्या दोन निरीक्षकांना सशर्त जामीन

मुख्य संशयित मनिंदरविरोधात सबळ पुरावे, अर्जावर उद्या निर्णय
लैंगिक छळप्रकरणी आयकरच्या दोन निरीक्षकांना सशर्त जामीन
Grants BailDainik Gomantak 

पणजी : आयकर कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यावरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित मनिंदर अत्तारी याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज घेण्यात आली. त्यावरील निर्णय उद्या 12 मे रोजी ठेवला आहे तर इतर दोघे संशयित दीपक कुमार आणि आदित्य वर्मा यांना पोलिस स्थानकात संध्याकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत उद्यापासून पाच दिवस उपस्थित राहण्याचे निर्देश देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Grants Bail
सिद्धी नाईक मृत्‍यू प्रकरणात नऊ महिने उलटले तरी तपास अधांतरीच

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत संशयित मनिंदर अत्तारी याच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि सतावणुकीचे आरोप केले आहेत. यासोबतच संशयित दीपक कुमार आणि आदित्य वर्मा हे वाईट नजरेने पाहत असल्याचे आरोप केले होते. या दोघा संशयिताविरुद्ध असलेले आरोप जामीनपात्र असल्याने न्यायालयाने त्यांना शर्ती घालून जामीन मंजूर केला.

Grants Bail
धारबांदोड्यात दुचाकीचा भीषण अपघात, तिघे जखमी

संशयित मनिंदर याच्याविरुद्धचे आरोप अजामीनपात्र असून त्याच्याविरुद्धचे पुरावे या पीडित महिलेने तक्रारीसोबत जोडले आहेत. त्यामध्ये अश्‍लिल व्हॉटस्अप मेसेज तसेच तिला कार्यालयातून घरी जाताना वाटेत अडवणे, असे आरोप करण्यात आले आहेत. प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असल्याचा तसेच सीसीटीव्ही फूटेज आणि डीव्हीआर खात्याकडून देण्यात आलेला नसल्याने अधिक चौकशीसाठी त्याची पोलिस कोठडी आवश्‍यक असल्याने जामीन दिला जाऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.