Baina : पुरोहित मारहाण प्रकरण! पोलिस आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडताहेत; विश्व हिंदू परिषद

पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये
Vishwa Hindu Parishad
Vishwa Hindu ParishadDainik Gomantak

वास्को बायणा समुद्र किनाऱ्यावर असलेल्या श्री संकट मोचन हनुमान मंदिरात पुरोहीत व अन्य सेवकांना झालेल्या मारहाण प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवर मुरगाव पोलिसांनी त्वरीत कारवाई करावी आणि संशयितांना त्वरीत अटक करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे तसेच पोलिसांच्या वेळकाढू धोरणावर त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. दरम्यान संशयितांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन पुरोहित ब्राह्मण संघ गोवा प्रदेशतर्फे मूरगाव पोलिसांना देण्यात आले.

Vishwa Hindu Parishad
Mahadayi Water Dispute: मंत्रिमंडळाचे 4 महत्वाचे निर्णय; गरज पडल्यास मोदी-शहांना भेटणार

बायणा येथे श्री संकट मोचन हनुमान मंदिरात ३० डिसेंबरच्या रात्री घडलेल्या घटनेचा विहिंपतर्फे आज पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. दारुच्या नशेत सुमारे २१ असामाजिक तत्वांनी पुजारी आणि मंदिराच्या सेवकांवर हल्ला केला. पुजाऱ्यावर हल्ला करणे आणि मारहाण करणे ही गुंडगिरी आहे. मुरगाव पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तक्रारीवर त्वरित कारवाई करावी आणि संशयितांना अटक करावी. जर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर पोलिस स्वतः हुन आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता योग्य ती करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे मठ मंदिर प्रमुख श्यामसुंदर नायक यांनी विश्व हिंदू परिषदेतर्फे केली.

Vishwa Hindu Parishad
Baina : पाण्यावरुन वाद पेटला; युवकांकडून पुरोहिताला मारहाण

यावेळी बोलताना जयंत जाधव यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केला. तसेच कारवाईस दिरंगाई होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रत्येक हिंदू बंधू भगिनींनी या घटनेबद्दल जागरूक राहून आताच संघटीत होऊन या कृत्याविरुद्ध उभे रहा अन्यथा अशा घटना घडतच राहतील. आपण हिंदू असूनही आज आपल्या पुरोहितांचे रक्षण करण्यास सक्षम नाही आणि या गुन्हेगारांना मोकाट सोडावे लागेल. पुढे अशीच परिस्थिती निर्माण होईल असे सांगताना जागरूक राहण्याचे आवाहन केले.

विश्व हिंदू परिषद दक्षिण गोवा मंत्री संजीव कोरगावकर यांनी या कृत्याविरुद्ध हिंदू बांधवांनी उभे ठाकण्याचे आवाहन केले. मंदिराचे पुजारी दत्तप्रसाद भट यांनी मुरगाव पोलिसांनी त्यांना वागणूक बरोबर दिली नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली. गुंडगिरीला आळा घालण्याचे सोडून पोलिस गुंडगिरीला चालना देत असल्याचे पुरोहितांने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com