‘बायंगिणी कचरा प्रकल्प’ नकोच

राजेश फळदेसाईंचा प्रकल्पाविरोधात मोर्चा, स्थलांतराची मागणी
Bainguinim Waste Management Project Agitation
Bainguinim Waste Management Project AgitationDainik Gomantak

पणजी : पणजी महापालिकेचा प्रस्तावित असलेल्या बायंगिणी कचरा प्रक्रिया प्रकल्पाला पुन्हा एकदा विरोध करण्यासाठी जुने गोवे पंचायत क्षेत्रातील रहिवाशांनी रविवारी विरोध केला. कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी आपल्या कारकिर्दीत कसल्याही परिस्थितीत हा कचरा प्रकल्प येथे येऊ देणार नाही, असा इशारा यावेळी दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात यांना घेऊन येथील वास्तव निदर्शनास आणून देणार आहोत. कुंभारजुवे मतदारसंघात येणाऱ्या सातही पंचायत क्षेत्रात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारले जातील, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

रविवारी सकाळी आमदार फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली जुने गोवे परिसरातील व कंदबा पठारावरील इमारतींतील नागरिकांनी कचरा प्रकल्पाला विरोध दर्शविला. मिर्लोक इमारतीपासून ते कचरा प्रकल्पाच्या जागेपर्यंत मोर्चा काढण्यात आला.

Bainguinim Waste Management Project Agitation
मारहाणप्रकरणी माल्कमचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

फळदेसाई म्हणाले की, कचरा प्रकल्प उभारल्यास येथील जागतिक वारसा स्थळावर विपरित परिणाम होईल, जुने गोवे येथे हजारो पर्यटक दररोज भेट देत असतात. प्रकल्पामुळे मिथेन वायूचाही वातावरणावर होऊन परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळे सरकारने हा प्रकल्प अन्यत्र न्यावा.

बायंगिणी येथील कचरा प्रकल्प व्हावा, यासाठी माजी मंत्री मायकल लोबो हे आग्रही होते. सध्या ते काँग्रेसमध्ये विरोध पक्षनेते आहेत. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात ते सोबत असतील का, असा सवाल केला असता फळदेसाई म्हणाले की, ते माहीत नाही.

Bainguinim Waste Management Project Agitation
Breaking : गोवा डेअरी निवडणुकीत राजेश फळदेसाईंचं पॅनल विजयी

पंचायतीचे ‘टीसीपी’कडे बोट

कदंबा पठारावरील महापालिकेने राज्य सरकारला कचरा प्रक्रिया प्रकल्पाला जागा दिली, तेव्हा येथे कोणतीच इमारत नव्हती. परंतु त्यानंतर येथे इमारती झाल्या, दोन हजारांवर लोक रहायला आले. त्यामुळे प्रकल्प येणार हे माहीत असतानाही जुने गोवे पंचायतीने इमारतींना परवानगी कशी दिली, असा सवाल उपस्थितांनी केल्यानंतर नगर नियोजन खात्याने त्या इमारतींना परवानगी दिल्याने पंचायतीलाही द्यावी लागली, असे उत्तर सरपंच मेघश्‍याम पर्वतकर यांनी दिले.

‘..तर अगोदर आपण रस्त्यावर झोपू’

कुंभारजुवे मतदारसंघात कचरा प्रक्रिया प्रकल्प येणार नाही. येथील लोकांच्या आरोग्याचा व वारसास्थळाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे. पाच वर्षांच्या कारकिर्दीत तरी आपण येथे प्रकल्प येऊ देणार नाही. सरकारने प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला, तर लोकांच्या आधी आमदार म्हणून आपण विरोधासाठी रस्त्यावर झोपू, असे फळदेसाई म्हणाले. सध्याच्या इमारतीमध्ये जे नव्याने फ्लॅट घेत आहेत, त्यांना या प्रकल्पाची माहिती का दिली जात नाही, अशी विचारणा केली असता, आधी झाले गेले विसरायचे, आता पुढचे काय, ते पहायचे असे आमदार फळदेसाई म्हणाले.

प्रकल्पाविषयी...

  • दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी महापालिकेसाठी हा प्रकल्प निश्‍चित केला होता, त्यासाठी 1 लाख 71 हजार चौ. मी. जागा देण्याचा निर्णय झाला.

  • पणजी महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, 2009 मध्ये जागा या प्रकल्पासाठी आरक्षित केली आणि 2017 मध्ये कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे हस्तांतरित केली.

  • गोवा राज्य कचरा व्यवस्थापन महामंडळाने 250 मे. टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे निश्‍चित केले.

  • या प्रकल्पासाठी तीन वेळा कचरा व्यवस्थापन महामंडळाने ई-निविदा काढल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com