Goa: डिचोलीत कोरोना प्रतिबंधक नियम पाळून "बकरी-ईद"चा उत्साह

बकरी ईद (Bakri Eid) म्हणजेच त्याग, करुणा, प्रेम आणि आदर या मूल्यांचे प्रतीक आहे.
Goa: डिचोलीत कोरोना प्रतिबंधक नियम पाळून "बकरी-ईद"चा उत्साह
Bakri Eid Representative ImageDainik Gomantak

'कोविड' (Covid19) च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून एकमेकांना 'ईद मुबारक' (Eid Mubarak)अशी शुभेच्छा देत डिचोलीत मुस्लिम बांधवांनी ईद-उल-जुहा अर्थातच बकरी ईद (Bakri-Eid) साजरी केली. मुस्लिम (Momedian) बांधवांनी घरीच ईद साजरी करून या सणाचा आनंद लुटला. (Bakri-Eid was celebrated by observing 'SPO' in Dicholi)

"Bakri-Eid" was celebrated by observing 'SPO' in Dicholi
"Bakri-Eid" was celebrated by observing 'SPO' in DicholiDainik Gomantak

बकरी ईद म्हणजेच त्याग, करुणा, प्रेम आणि आदर या मूल्यांचे प्रतीक आहे. महामारीमुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही मुस्लिम धर्मीय बांधवांचा मोठा सण असलेल्या 'बकरी-ईद' साजरी करण्यावर तसेच जाहीर नमाजवर निर्बंध आले होते. मागील सोमवारी डिचोली पोलिस स्थानकात झालेल्या बैठकीत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून बकरी-ईद साजरी करण्यास मशीद संस्थांनी मान्यता दिली होती. (Bakri-Eid was celebrated by observing 'SPO' in Bicholim)

Bakri Eid Representative Image
Goa: ‘एकजुटीने झुंज देऊया’ व्‍हायरल

बकरी ईदनिमित्त आज शहरातील आझाद जामा मशीद परिसरात मोठी गर्दी दिसून आली नाही. मुस्लिम बांधव तसेच मुले गटागटाने एकमेकांना प्रत्यक्ष शुभेच्छा देताना दिसून येत. हिंदू आणि अन्य धर्मीयांनी प्रत्यक्ष भेटून वा समाज माध्यमातून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. साखळी आणि पिळगाव येथेही मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com