Bal Rath Goa : बालरथ संघटनेचा सरकारला अल्टिमेटम; केली 'ही' मागणी

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
Bal Rath Protest
Bal Rath ProtestDainik Gomantak

ऑल गोवा युनायटेड बालरथ युनियनने सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आपल्या विविध मागण्या सरकारपुढे मांडत त्या पूर्ण करण्यासाठी हा अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. संघटनेच्या अध्यक्ष स्वाती केरकर यांनी पणजीमध्ये ही माहिती दिली आहे.

ऑल गोवा युनायटेड बालरथ युनियन या संघटनेने गोवा सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. या मागण्यांमध्ये पगारवाढ, पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीचे फायदे, विमा आणि रजांची मुभा अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य न झाल्यास 15 दिवसांनंतर संपावर जाण्याचा इशारा संघटनेच्या अध्यक्ष स्वाती केरकर यांनी दिला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत एकही बालरथ बाहेर पडू न देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Bal Rath Protest
Mahadayi Water Dispute : म्हादईच्या बचावासाठी आता शाळकरी मुलांचाही एल्गार

बालरथांच्या माध्यमातून गोव्यातील विविध शाळांमध्ये मुलांना घरापासून शाळेपर्यंत आणि परत घरी सोडण्याची सुविधा पुरवली जाते. सरकारने शाळांना बालरथ उपलब्ध करुन दिले असून बऱ्याच दुर्गम भागातील शाळांमध्ये बालरथांचा मोठा फायदा होताना दिसतोय. मात्र आता बालरथ संघटनेने संपाचं हत्यार उपसल्यामुळे सरकारसोबतच शाळांसमोरही नवं संकट उभं ठाकलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com