Ponda News: बाळ सप्रे यांचे साहित्य वास्तवाशी निगडीत- कालिदास मराठे

फोंड्यातील गोवा मराठी अकादमीचा साहित्य अभिवाचन कार्यक्रम रंगला
Ponda News
Ponda NewsDainik Gomantak

साहित्यिक बाळ सप्रे यांनी आपल्या लेखनातून वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न केला असून अशा वास्तवाशी निगडीत असलेल्या लेखनामुळे समाजातील बऱ्या वाईटाची जाणीव वाचकांना होत असते, म्हणूनच बाळ सप्रे यांचे साहित्य हे आजच्या पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरू शकते, असे उद्‌गार प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ कालिदास मराठे यांनी काढले.

फोंड्यातील विद्या वृद्धी विद्यालयाच्या सभागृहात काल गोवा मराठी अकादमीच्या फोंडा प्रभागातर्फे साहित्य अभिवाचन संवाद शृंखला पुष्प दुसऱ्या या उपक्रमात प्रसिद्ध साहित्यिक बाळ सप्रे यांच्या साहित्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर बाळ सप्रे, कालिदास मराठे तसेच डॉ. रेवा दुभाषी, सचिन मणेरीकर, गोवा मराठी अकादमी फोंडा प्रभागाचे अध्यक्ष नीलेश नाईक, विद्या वृद्धीचे अध्यक्ष उदय डांगी तसेच गोवा मराठी अकादमी फोंडा प्रभागाच्या सहसचिव श्रुती हजारे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

स्वागत व प्रास्ताविक करताना नीलेश नाईक यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र तारी यांनी केले तर श्रुती हजारे यांनी आभार मानले. यावेळी गोवा मराठी अकादमीच्या फोंडा प्रभागातर्फे बाळ सप्रे यांचा तसेच व्यासपीठावरील इतरांचा गौरव करण्यात आला. विद्या वृद्धीतर्फे उदय डांगी यांनी साहित्य क्षेत्रातील उत्तुंग यशाबद्दल बाळ सप्रे यांचा सत्कार केला. यावेळी रुक्मी डांगी तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Ponda News
Goa Government Schools : बंद असलेल्या 'त्या' 68 शाळांबाबत गोवा सरकारचा मोठा निर्णय

साहित्यपटच उलगडला !

कार्यक्रमात रेवा दुभाषी यांनी बाळ सप्रे यांच्या लेखावर तर सचिन मणेरीकर यांनी कथांवर भाष्य केले. खुद्द लेखक बाळ सप्रे यांनी आपला प्रकाशित लेख स्वतःच ढंगदार शैलीत वाचला आणि त्यावर रेवा दुभाषी यांनी छान विस्तृत विवरण केले तर सचिन मणेरीकर यांनी सप्रे यांच्या ' भ्रमाचा भोपळा ' कथासंग्रहातील एक कथा सुरेखरित्या सादर केली अन् त्यावर आपले मत मांडले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात लेखक बाळ सप्रे यांना उपस्थित प्रेक्षकांनी बोलते केले आणि त्यांच्या एकूणच साहित्याचा जीवनपटच समोर साकारला . उपस्थित साहित्य रसिकांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली.

Ponda News
Valpoi News: लोकसंस्कृतीचे संवर्धन करणे विद्यार्थ्याच्या हाती- प्राचार्य रियाज जमादार

वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठे यांनी आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे चित्रण साहित्यात उमटले असून त्यामुळेच वास्तववादी लेखन करण्यावर आपला भर राहिला असे सांगून आपल्या लेख, कथांबरोबरच कादंबऱ्यांनाही वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. साहित्य अभिवाचन कार्यक्रमात स्वतः बाळ सप्रे यांनी आपला प्रकाशित लेख वाचून दाखवला. यावेळी बाळ सप्रे यांच्याशी उपस्थित प्रेक्षकांनीही संवाद साधत विविध प्रश्‍न विचारले. त्यांना बाळ सप्रे यांनी समर्पक उत्तरेही दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com