Banastarim Bridge Closed: बाणास्तरी पूल वाहतुकीसाठी काहीकाळ राहणार बंद

रस्ते, पूल उभारणी नंतर काही काळाने त्यांची डागडुजी करणे, आवश्यक ती तपासणी करणे गरजेचे असते.
 Banastarim Bridge Closed
Banastarim Bridge ClosedDainik Gomantak

रस्ते, पूल उभारणी नंतर काही काळाने त्यांची डागडुजी करणे, आवश्यक ती तपासणी करणे गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर बाणास्तरी पूल देखील दोन तासांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. Banastarim Bridge Closed

NH-4A वरील बाणास्तरी पूल 22 जानेवारी रोजी सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत डेक पातळीची तपासणीच्या कारणास्तव सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी मांडवी नदीवरील ‘अटल सेतू’ पुलाला जोडणाऱ्या मेरशी सर्कल ते कदंब सर्कलपर्यंतच्या रस्त्याच्या रँपचे काम हाती घ्यावयाचे असल्याने हा पूल देखील चार आठवडे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यासंदर्भातचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता.

 Banastarim Bridge Closed
Mahadayi Bachao Protest : विर्डीतील जाहीर सभेला गर्दी, जिज्ञासा आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बाणास्तरी पुलावर बंद काळातील दोन तासांकरिता थोडीफार वाहतूक कोंडीची समस्या जाणवू शकते. त्यामुळे तुमचं जर काही महत्वाचं काम असेल तर सकाळी 6.30 ते 8.30 ही वेळ टाळून घराबाहेर पडा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com