Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघाताच्या रात्रीच कटकारस्थानाचा पर्दाफाश!

Banastarim Bridge Accident: सत्र न्‍यायालयाचे निरीक्षण : तरी पोलिसांनी सोडले दोषींना मोकळे
Major Accident On Banastarim Bridge
Major Accident On Banastarim Bridge Dainik Gomantak

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघातातील चालकाला वाचवण्यासाठी रचण्यात आलेल्या कटकारस्थानचा पर्दाफाश अपघाताच्या त्याच रात्री म्हार्दोळ पोलिस स्थानकाच्या प्रमुखांसमोर झाला होता.

तपासकामात दिशाभूल करण्यासाठी कटकारस्थान रचण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते, तरीही तेव्हा पोलिसांनी दोषींना अटक न करता मोकळे सोडण्याची बाब ही चिंताजनक असल्याचे निरीक्षण फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयाने ॲड. अमित पालेकर यांना सशर्त जामीन देताना आदेशात केले आहे.

Major Accident On Banastarim Bridge
Nathuram Godse: महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशाला शाप; राज्यपालांचे धाडसी विधान

अपघातानंतर त्याच रात्री मर्सिडीज कारचा चालक परेश सावर्डेकर याने ॲड. अमित पालेकर व गणेश लमाणी या दोघांना जुवारवाडा-माशेल येथील अत्रेय सावंत यांच्या घरी बोलावले. यावेळी इतर काहीजण होते.

सावर्डेकर याने त्याचा नेहमीचा कारचालक गणेश लमाणी याला अपघातातील चालक म्हणून पोलिसांसमोर दाखल करण्याचा कट रचला.

त्यानुसार सावर्डेकरने म्हार्दोळ पोलिस स्थानक निरीक्षक मोहन गावडे यांच्याशी ६ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री १० वा. संपर्क साधून मर्सिडीजच्या चालकाला कुंडई औद्योगिक वसाहत जंक्शनला आणून स्वाधीन करतो, असे सांगितले.

त्यानुसार त्याने गणेश लमाणी हा अपघातातील चालक असल्याचे गावडे यांना पटवून दिले. या सर्वांनी गावडे यांना चुकीची माहिती देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तेथे ॲड. अमित पालेकर व एक कनिष्ठ वकीलही होता, असे तपासात समोर आले होते.

Major Accident On Banastarim Bridge
Janta Darbar: वास्‍कोतील जनता दरबारात मंत्री सुदिन ढवळीकर निरुत्तर

तपास पथकाच्या हाती लागला पुरावा

  1. अपघाताच्या रात्री कुंडई औद्योगिक वसाहत जंक्शनच्या ठिकाणी थांबलेल्यांमध्ये परेश सावर्डेकर, गणेश लमाणी, ॲड. पालेकर व इतर काहीजण होते. सावर्डेकरने निरीक्षक गावडे यांना सांगितले की लमाणी अपघातावेळी कार चालवत होता.

  2. लमाणी यानेही सांगितले की तो कार चालवत होता व बाजूला परेश बसला होता. त्यांच्याव्यतिरिक्त कारमध्ये इतर कोणीही नव्हते. हे सांगताना तेथे ॲड. अमित पालेकर हेसुद्धा होते. हे सर्वजण गावडे यांना कारचालक लमाणी असल्याचे पटवून देत होते.

  3. मात्र, लमाणी याची पोलिस स्थानकात आणून जबानी घेतली गेली तेव्हा त्याने कार तो चालवत नसल्याचे उघड केले. गेली १५ वर्षे तो सावर्डेकर याच्याकडे चालक म्हणून कामाला असल्याने त्याला वाचवण्यासाठी हा अपघाताचा गुन्हा मी माझ्यावर घेतला असे स्पष्ट केले.

  4. अपघातानंतर परेशला या अपघाताच्या प्रकरणातून वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याबरोबरच पोलिसांची दिशाभूल केल्याचा थेट पुरावा विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी मिळवला आहे, असे निरीक्षण आदेशात न्यायालयाने केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com