‘बांदोडकर गोल्ड ट्रॉफी’ पुन्हा चर्चेत, आलेमाव ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा

बांदोडकर गोल्ड ट्रॉफीमधील सोने गेले कुठे?
‘बांदोडकर गोल्ड ट्रॉफी’ पुन्हा चर्चेत, आलेमाव ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा
Churchill Alemao|Bandodkar Gold TrophyDainik Gomantak

पणजी : गोव्यातील फुटबॉलसाठी भूषणावह ‘बांदोडकर गोल्ड ट्रॉफी’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या करंडकाचे कथित सोने गेले कुठे, असा सवाल गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. करंडकाच्या सोन्याचा पाठपुरावा करण्यासाठी आपण स्वखर्चाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Bandodkar Gold Cup trophy has been switched, claims Churchill Brothers boss Alemao)

चर्चिल आलेमाव यांनी सांगितले, की 1970 साली बांदोडकर गोल्ड कप स्पर्धेला सुरवात झाली. तेव्हा या करंडकाच्या सोन्याची किंमत 20 लाख रुपये असल्याचे नोंदीत आहे. तेव्हाच्या सोन्याचा भाव लक्षात घेता करंडकाचे सोने एकूण 10 किलो असायला हवे. सध्याच्या सोन्याचा दरानुसार या करंडकाचे मूल्य सुमारे 45 कोटी रुपये व्हायला हवे; पण आता या करंडकात सोने कमी असल्याचे सांगण्यात येते व साधारणतः दोन किलो सोने असल्याचे मानले जाते. ही तफावत संशयास्पद आहे. त्याचा शोध घेण्यासाठी मी न्यायालयात जाणार आहे. बांदोडकर गोल्ड ट्रॉफीसंदर्भात काही जुने दस्तऐवज, फाईल्स गहाळ झाल्याचाही आरोप चर्चिल यांनी केला.

Churchill Alemao|Bandodkar Gold Trophy
आयकर निरीक्षक मनिंदर सिंग अट्टारींचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

‘गोल्ड ट्रॉफी’ संघटनेच्या कोठारात

ही ट्रॉफी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब (दयानंद) बांदोडकर यांनी गोवा फुटबॉल संघटनेला दिली होती. 1970 मध्ये स्पर्धेला सुरवात झाली. नंतर ही स्पर्धा बंद झाली व करंडक बँकेच्या लॉकरमध्ये राहिला. त्यानंतर 2016 मध्ये पुन्हा एकदा स्पर्धा घेण्यात आली. त्यावेळी बांदोडकर गोल्ड ट्रॉफी बँकेच्या लॉकरमधून बाहेर काढण्यात आली.

त्यानंतर पुन्हा करंडक बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यऐवजी काही काळ जीएफडीसीच्या कार्यालयात, तर नंतर तो ‘जीएफए’च्या कोठारात पडून आहे, अशी माहितीही आलेमाव यांनी दिली. करंडक बँकेतून आणताना आणि नंतर जीएफएच्या कोठारात ठेवताना तत्कालीन जीएफए व्यवस्थापकीय समितीने योग्य प्रक्रिया हाताळली नसल्याचा आरोपही चर्चिल यांनी यावेळी केला.

- विधानसभेतही पडसाद

मी आमदार असताना बांदोडकर गोल्ड ट्रॉफीच्या सोन्याविषयी विधानसभेत हा विषय मांडला होता. तत्कालीन क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी त्यावर चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते, पण नंतर काहीच हालचाल झाली नाही, अशी खंत चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.