बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याची गळफास लावून आत्महत्या

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

 वेलमुरंगन ए. हा गेले ८ महिने शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. बँकेतील स्टोअररूममध्ये हा प्रकार घडला. आत्महत्येचे  कारण मात्र समजू शकले नाही.

पणजी- बँक ऑफ इंडियाच्या मये शाखेतील एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सकाळी बँकेतच गळफास लावून आत्महत्या केली आहे. मयताचे नाव वेलमुरंगन ए. असे असून तो मूळचा तामिळनाडू येथील आहे. गेले ८ महिने तो शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. बँकेतील स्टोअररूममध्ये हा प्रकार घडला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा सुरु आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो आज सकाळी ९.२० वा. बँकेत आला. त्यानंतर इतर कर्मचारी वर्ग बँकेत आले. बँकेच्या स्टोअररूमचे दार खुले असल्याने कर्मचाऱ्यांनी डोकावून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. 

दरम्यान, आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. बँकेच्या व्यवहारांशीही या घटनेचा काही संबंध नाही. त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या