गोव्यात बँका सलग चार दिवस बंद; बँकांच्या खासगीकरणाला विरोध

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 मार्च 2021

बँकांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावित निर्णयाला विरोध करण्यासाठी 15 व 16 मार्चला दोन दिवशीय देशव्यापी बँक संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये गोव्यातीलही विविध बँक संघटना सामील होणार असल्याने या काळात बँक कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.

पणजी :  बँकांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावित निर्णयाला विरोध करण्यासाठी 15 व 16 मार्चला दोन दिवशीय देशव्यापी बँक संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये गोव्यातीलही विविध बँक संघटना सामील होणार असल्याने या काळात बँक कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. 13 मार्च दुसरा शनिवार, तर 14 मार्च रविवार असल्याने सलग चार दिवस या बँका बंद राहणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक फोरमच्या (यूएफबीएफ) छताखाली देशातील नऊ बँक संघटना असून सुमारे 10 लाखांहून अधिक बँकेचे कर्मचारी तसेच अधिकारी त्याचे सदस्य आहेत. हल्लीच देशाच्या अर्थसंकल्पात दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा झाली आहे.

मगोचे आमदार सुदीन ढवळीकरांनी सुरुवातीला मांडलेली याचिका घेतली मागे

सार्वजनिक बँकांचा देशाच्या विकासामध्ये तसेच हरित, नील व डेअरी क्षेत्रात महत्वाची भूमिका आहे. कृषी, रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन, ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण, निर्यात, साधनसुविधा, महिला सशक्तीकरण, लघु व मध्यम उद्योग याना प्राधान्य देऊन बँकांनी त्यावर लक्ष केंद्रित केले होते. वर्ग बँकिंगचे समूह बँकिंगमध्ये बदल करून सामान्य लोकांना तसेच समाजाला सेवा दिली जात नव्हती ती मिळू लागली होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँका मोठ्या प्रमाणात नफा करत आहेत. त्यामुळे या बँका अधिक मजबूत करण्याऐवजी त्याचे खासगीकरण त्या कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे, असे मंचचे निमंत्रक संजीव बंदलीश यांनी म्हटले आहे. बँकांचे खासगीकरण झाल्यास त्यामध्ये कार्यक्षमता नसेल, तसेच सुरक्षितता राहणार नाही.

सासष्‍टीत अठरा महिन्‍यांत नऊ खून

जगातील खासगी बँकांना अपयश आलेले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने घोषित केलेल्या खासगीकरणाला विरोध करण्यात येत असल्याचे बंदलीश यांनी मत व्यक्त केले आहे. थकबाकीदारांच्‍या हाती बँक देण्‍याचा डाव? बँकांचे थकबाकीदार तसेच कर्जदार आहेत त्यांच्याविरुद्ध ठोस पावले उचलण्याऐवजी केंद्र सरकार त्यांच्याच हाती बँकांचा व्यवहार देण्याची ही चाल खेळत आहे. त्यामुळे देशव्यापी आंदोलन व संप पुकारून बँकांचा असलेला विरोध केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचा यातून प्रयत्न असेल. या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संपात सहभागी व्हावे, असे आवाहन निमंत्रक बंदलीश यांनी केले आहे.

संबंधित बातम्या