Goa: बार काऊन्सिल ऑफ इंडियाणार राज्यात खास सुरू करगी विद्यापीठ 
bar council of India

Goa: बार काऊन्सिल ऑफ इंडियाणार राज्यात खास सुरू करगी विद्यापीठ 

पणजी: इंडियन युनिव्हर्सिटी ऑफ लिगल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (Indian University of Legal Education and Research) हे खासगी विद्यापीठ वकिलांची बार काऊन्सिल ऑफ इंडिया ही संघटना राज्यात सुरू करणार आहे. सध्या सिंगापूर येथे कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राच्या धर्तीवर लवाद केंद्रही राज्यात सुरू करण्याचा त्यांनी प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. (Bar Council of India will start a special university in Goa)

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, त्यांनी सरकारकडे भूखंड उपलब्ध करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला आहे. या विद्यापीठात 20 टक्के जागा गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. 

मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या धर्तीवर वस्तू व सेवा कर कायदा दुरूस्ती करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे सांगितले. राज्यातील विनावापर असलेल्या सरकारी प्राथमिक शाळांच्या इमारती ज्या ठिकाणी अंगणवाड्या सुरू आहेत तेथे त्या इमारती महिला व बालकल्याण खात्याकडे वर्ग करण्यास सरकारने मान्यता दिली. याशिवाय उर्वरीत इमारती शिक्षण व सामाजिक क्षेत्रात ना नफा तत्वावर काम करणाऱ्या संस्था संघटनाना भाडेपट्टीवर देण्याचेही सरकारने ठरवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. धारबांदोडा येथे पाणी साठवणुकीसाठी जलाशय बांधण्यासाठी संजीवनी साखर कारखान्याची 750  चौरस मीटर जमीन जलसंपदा खात्याला वर्ग करण्याचाही निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com