बिचारे बारवाले! ऊठसूट गोवा सरकारचं त्यांच्याकडेच लक्ष

बिचारे बारवाले! ऊठसूट गोवा सरकारचं त्यांच्याकडेच लक्ष
Bar industry in Goa

पणजी: गेल्या वर्षीचे लॉकडाऊन(Lockdown) असो वा यंदाचा सध्या चालू असलेला कर्फ्यू असो, त्याची झळ एकंदर व्यवस्थेलाच काही प्रमाणात बसलेली असली तरी बारवाल्यांच्या(Goa Bar) म्हणण्याप्रमाणे सर्वाधिक फटका त्यांना बसलेला आहे. सरकारने गेल्या महिनाभरात अनेक व्यावसायिकांना निर्बंधातून सवलत दिली, पण बारवाल्यांना अजून ती मिळालेली नाही. त्यांच्या दाव्याप्रमाणे प्रत्येकवेळी ऊठसूट सरकार त्यांनाच लक्ष्य करत असते. (Bar industry in Goa affected due to COVID-19 pandemic)

जून महिन्यात आतापर्यंत म्हणजे सोळा दिवसांत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुपटीहून अधिक आहे. त्यामुळे ह महिना आतापर्यंत तरी दिलासादायक असा ठरलेला आहे. राज्यात बुधवारी 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या 2960 एवढी झाली आहे. 1 ते 16 जून दरम्यान 52,601 लोकांनी चाचण्या केल्या. त्यात 7,692 नवे बाधित आढळून आले. याच काळात 16,175 जण बरे झाले. या सोळा दिवसांमध्ये 236 नागरिकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1,101 कोरोना बाधितांना इस्पितळात दाखल  करण्यात आले, तर 6,588 बाधित घरीच अलगीकरणात राहण्यावर भर दिला. या काळात 1,263 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला.

बारवर बंदीची टांगती तलवार

कोणतीही निवडणूक असो वा अन्य काही असो, बार व दारू दुकानांवर बंदीची सक्ती होत असते. सरकारला सर्वाधिक महसूल मद्य क्षेत्रांतून मिळत असतो, पण तरीही बंदीची टांगती तलवारही त्यांच्यावरच लटकत असते. ते खरे असले तरी बारवाल्यांच्या पोटात दुखते ते बार बंद ठेवले गेले म्हणून नव्हे तर होलसेल मद्य विक्रेत्यांना ती बंदी लागत नाही याचे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या घाऊक विक्रेत्यांकडे उघड्यावर थांबून मद्य पीत असलेले सर्रास आढळतात. पण सरकारी विशेषतः संबंधित यंत्रणा ते गांभिर्याने घेत नाही अशीही त्यांची तक्रार आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com