
रेईश-मागूशमधील जमीन हडफ करणाऱ्या बनावट मुंडकाराविरूध्द कारवाई करून त्याला जमिनीतून हटविण्यात यावे, अशी मागणी रोनाल्ड फर्नांडिस यांनी बार्देश मामलेदार कार्यालयाकडे तक्रारीद्वारे केली आहे.
तक्रारदार रोनाल्ड थॉमस फर्नांडिस हे कॅनडामधून सुट्टीवर गोव्यात आले होते. तेव्हा त्यांच्या रेईस मागूस येथील सर्व्हे क्रमांक 21/1 मधील जमिनीत पक्के बांधकामाचे अतिक्रमण सुरू असल्याचे आढळून आले. त्यांनी पंचायत व मामलेदार कार्यालयाकडून जमिनीची कागदपत्रे मिळवली, तेव्हा सदर जमिनीत पार्वती महादेव चोर्लेकर नामक व्यक्तीने मुंडकार खटल्याच्या आधारे ही जमीन मिळवल्याचे स्पष्ट झाले .
मुंडकार खटल्याचा हा निवाडा 1997 मध्ये मामलेदार कार्यालयातून निकाली काढला होता. यावेळी संबंधितांनी बनावट कागदपत्रे सादर करून तसेच बोगस व्यक्ती मामलेदार कार्यालयात हजर करून हा खटला आपल्या बाजूने मिळवून घेतला, असा दावा फर्नांडिस यांनी केला आहे. याबाबत जमिनीच्या कागदपत्रांसह तक्रार मामलेदार कार्यालयाकडे फर्नांडिस यांनी सादर केली. या अतिक्रमण केलेल्या बोगस मुंडकारावर कारवाई करून त्यास आपल्या जमिनीतून बाहेर काढावे, अशी मागणी त्यांनी मामलेदारांकडे केली आहे.
फर्नांडिस यांना जमीन परत करा
संजय बर्डे म्हणाले, या 1997 निकाली काढलेल्या मुंडकार खटल्याची चौकशी करावी व फर्नांडिस यांना जमीन परत करावी. तसेच तपासणी न करता चुकीच्या कागदपत्रांद्वारे निवाडा दिलेल्या तत्कालिन मामलेदारांवर सरकारने कारवाई करावी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.