बार्देश येथील चोरी प्रकरणी कर्नाटकातील एकाला अटक

कर्नाटक विजापूर येथे संशयितावर पोलिसांनी केली कारवाई
colvale  police
colvale police Dainik Gomantak

Bardez News: बार्देश येथील युनायटेड टेलिकॉम कंपनीच्या गोदामातून ​​9 सप्टेंबर रोजी सुमारे 1 लाख 77 हजार रुपय मुद्देमाल व मशीन चोरीला गेल्याची तक्रार कोलवाळ पोलिसात दाखल झाली होती. यामध्ये चोरट्याने स्प्लिसिंग मशीनसह इतर साहित्य लांबवले होते.

(Bardez telecom company warehouse theft One arrested)

colvale  police
Goa Accident: करमल घाटात अपघातांची मालिका सुरुच, रस्ता रुंदीकरणाची आवश्‍यकता!

या तक्रारीवरुन कोलवाळ पोलिसांनी कारवाई करत आज एकाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या कारवाईत कर्नाटक राज्यातील आरोपीला विजापूर येथून ताब्यात घेतले आहे.

colvale  police
Goa Accident: करमल घाटात अपघातांची मालिका सुरुच, रस्ता रुंदीकरणाची आवश्‍यकता!

त्याच्याकडून चोरी केलेले साहित्य व 1 लाख 77 हजार रुपये ही जप्त करण्यात आले आहेत. कोलवाळ पोलिसांना आरोपीबाबत सुगावा लागल्यानंतर कर्नाटक राज्यातील आरोपीची माहिती मिळवली, यातून संशय वाढल्याने त्याला ताब्यात घेतले असता पोलिसांना आरोपीकडे चोरीचा मुद्देमाल ही सापडला आहे. या प्रकरणात पोलिस अद्याप तपास करत असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा समावेश आहे का ? याचा ही तपास पोलिस घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com