Chain Snatching Goa: बार्देशात सोनसाखळी चोरीची दुसरी घटना

मागील आठवड्याभराच्या कालावधीत बार्देशात दोन सोनसाखळी चोरण्याच्या घटना उघडकीस आल्या.
Goa News|Chain Snatching
Goa News|Chain SnatchingDainik Gomantak

Chain Snatching Goa: मागील आठवड्याभराच्या कालावधीत बार्देशात दोन सोनसाखळी चोरण्याच्या घटना उघडकीस आल्या असून रविवारी पर्वरीत एका महिलेचे 2.99 लाखांचे मंगळसूत्र अज्ञात चोरांनी हिसकावल्याची घटना समोर आली आहे.

म्हापशात 5 रोजी बोडगिणी येथे एका महिलेची सोनसाखळी हिसकावून नेण्याचा प्रकार घडला होता. ही महिला आपल्या कुटुंबीयांसोबत जत्रेतून घरी जात होती, त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी 4 लाख 40 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी चोरली होती.

पर्वरी येथील जिवोत्तम मठाजवळ काल दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी एका महिलचे मंगळसूत्र व सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची तक्रार पर्वरी पोलिस स्थानकात नोंदविण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन पुंडलिक राव ही बाबोळी येथील साठवर्षीय महिला जिओतम मठ पर्वरी येथे उभी होती.

Goa News|Chain Snatching
Zuari-Bridge: नव्या झुआरी पुलावरून सेल्फी घेण्याचा मोह पर्यटकांना आवरेना

त्यादरम्यान, दोन हेल्मेट घातलेले युवक आपल्या मोटारसायकलने आले व त्यांनी त्या महिलेच्या गळ्यातील सुमारे तीन लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र व सोनसाखळी हिसकावून पळ काढला, दोन्हीही युवकांची ओळख अजूनही पटली नसून पर्वरी महिला पोलिस उपनिरीक्षक प्रणिता मांद्रेकर अधिक चौकशी करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com