सारमानस फेरी धक्क्यावर ‘बॅरिकेड्स’

वाहतुकीवर येणार नियंत्रण: शिस्त पाळण्याचे पोलिसांचे आवाहन
सारमानस फेरी धक्क्यावर ‘बॅरिकेड्स’
Barricades on Sarmanas FerryDainik Gomantak

डिचोली: सारमानस - टोंक जलमार्गावरील सारमानस फेरी धक्क्यावरील वाहनांच्या बेशिस्तपणावर आता लगाम येणार आहे. या फेरीधक्क्यावर स्थानिक पिळगाव पंचायतीतर्फे ‘बॅरिकेड्स’ बसविण्यात आले आहेत. पिळगाव येथील अत्रेय कंपनीतर्फे हे बॅरिकेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

डिचोली वाहतूक पोलिस विभागाचे निरीक्षक सुदेश वेळीप यांच्या हस्ते या ‘बॅरिकेड्स’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच संदीप सालेलकर, उपसरपंच सौ. उर्मिला प्रभुगावकर, पंच नीलेश जल्मी आणि अनिल नाईक तसेच अत्रेय कंपनीचे व्यवस्थापक जय आदी नागरिक उपस्थित होते. वाहनचालकांनी शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिस निरीक्षक सुदेश वेळीप यांनी यावेळी केले.

स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट आणि अत्रेय कंपनीच्या सहकार्यामुळे बॅरीकेड्सची सोय झाली, असे सरपंच संदीप सालेलकर यांनी सांगितले. सारमानस - टोंक जलमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन उर्मिला प्रभुगावकर यांनी केले.

Barricades on Sarmanas Ferry
'गोव्यातील पंचायत निवडणुकीनंतर होणार नोकरभरती'

शर्यतीवर नियंत्रण येणार: माशेल, फोंडा, पणजी आदी भागात जाणारे सारमानस, पिळगाव, डिचोली आदी भागातील अनेकजण सारमानस-टोंक जलमार्गावरून प्रवास करतात. रोज सकाळी दहा वाजेपर्यंत या जलमार्गावर प्रचंड गर्दी असते. आधीच या जलमार्गावर दोनच फेरीबोटी, त्यातच वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना नव्हती. त्यामुळे फेरीबोट धक्क्याला लागली, की दुचाकी आणि चारचाकी वाहने फेरीबोटीत घालण्यासाठी वाहनचालकांमध्ये शर्यत सुरू असते. वाहने फेरीबोटीत घालण्यासाठी वाहनचालकांमध्ये अधूनमधून वादही होतात. फेरीबोटीतून वाहने बाहेर काढतानाही वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यातल्या त्यात एखादी फेरीबोट नादुरुस्त राहिली, तर मोठी समस्या निर्माण होत असते. मात्र, आता बॅरीकेड्स बसविण्यात आल्याने या प्रकारावर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.