बायणा समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग मानांकन मिळावे : कार्लूस आल्मेदा

दैनिक गोमंतक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

बायणा समुद्रकिनाऱ्याला ''ब्लू फ्लॅग'' मानांकन प्राप्त झाल्यास वास्कोचा विकास निश्चित होईल. यासाठी बायणा समुद्रकिनारा पर्यटन दृष्ट्या विकसित होणे काळाची गरज आहे असे मत  आमदार कार्लूस आल्मेदा यांनी व्यक्त केले.  

मुरगाव: बायणा समुद्रकिनाऱ्याला ''ब्लू फ्लॅग'' मानांकन प्राप्त झाल्यास वास्कोचा विकास निश्चित होईल. यासाठी बायणा समुद्रकिनारा पर्यटन दृष्ट्या विकसित होणे काळाची गरज आहे असे मत  आमदार कार्लूस आल्मेदा यांनी व्यक्त केले.  

वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा यांनी मुरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दीपक नागडे, नंदादीप राऊत, माजी नगरसेवक फेड्रीक हेन्रीक्स, वास्को भाजपा मंडळाचे सरचिटणीस यतिन कामुर्लेकर यांच्या उपस्थितीत रवींद्र भवन येथे पत्रकार परिषद घेतली होती तेंव्हा आमदार आल्मेदा यांनी बायणा समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग मानांकन मिळाल्यास वास्कोचा चेहरा मोहरा बदलेल असे मत व्यक्त केले होते.यामुळे संपूर्ण मुरगाव तालुक्याचा आर्थिकदृष्ट्या विकास होईल या साठी तालुक्यातील अन्य सर्व आमदारांनी ब्लू फ्लॅग मानांकनासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी आपल्या कारकिर्दीत  थकबाकी वसूल करण्यासाठी आपण मोठे कष्ट घेतल्याचे सांगितले. मावळते नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी सांगितले की आपण,   कचरा विल्हेवाट प्रकल्पात साठलेला कचऱ्याची विल्हेवाट लावली.  तसेच सडा कचरा प्रकल्पावर नवीन प्रकल्प आणण्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती राऊत यांनी दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक फॅड्रीक हेन्रिक्स यांनी कोविड-१९ वर कशा प्रकारे नियंत्रण आणले याविषयी सविस्तर माहिती पत्रकार परिषदेतून दिली. माजी नगरसेवक यतीन कामुर्लेकर यांनी येणाऱ्या काळात वास्कोतील विकास कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. 

संबंधित बातम्या