कॉल फॉरवर्ड सुविधेपासून सावधान 

विलास महाडिक
गुरुवार, 23 जुलै 2020

एखाद्या अज्ञात व्यक्तीने सांगितलेला क्रमांक डाईल केल्यास तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता, त्यामुळे सावध राहावे अशी सूचना पोलिस खात्याच्या सायबर कक्षाने केली आहे. 

पणजी

काही सायबर गुन्हेगार बँक अधिकारी असल्याचे सांगून मोबाईलवर संपर्क साधत आहेत व संशयास्पद क्रमांक असलेला कॉल करून फॉरवर्ड करण्यास सूचना करत आहेत यापासून मोबाईलधारकांनी साधव राहावे. एखाद्या अज्ञात व्यक्तीने सांगितलेला क्रमांक डाईल केल्यास तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता, त्यामुळे सावध राहावे अशी सूचना पोलिस खात्याच्या सायबर कक्षाने केली आहे. 
डिजीटल यंत्रणेचा वापर करून आयटी तंत्रज्ञानात तरबेज असलेले गुन्हेगार बँक खात्याला जोडलेल्या मोबाईल धारकांना बँक अधिकारी असल्याचे सांगून अनेकवेळा माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. काहीवेळा त्यांच्या सूचनांना अनेकजण बळी पडलेले आहेत व या मोबाईल धारकांच्या बँक खात्यावरील रक्कम गायब होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारे काही सायबर गुन्हेगार मोबाईलक धारकांशी संपर्क साधून मोबाईवर काही क्रमांक पाठवत आहेत. या क्रमांकावरून मोबाईल धारकाने फोन केल्यावर हा फोन ‘हॅक’ केला जातो व त्यानंतर तुमच्या या मोबाईलवर पूर्ण ताबा हे सायबर गुन्हेगार मिळवतात. यावरून ते तुमच्या मोबाईलवर 
‘ओटीपी’ मिळवून त्यानंतर ते खातेधारकाची रक्कम काढून झाल्यानंतर हॅक केलेला मोबाईल पुन्हा पूर्ववत करतात. मात्र जोपर्यंत ही माहिती कळते तोपर्यंत खात्यावरील रक्कम लंपास केलेली असते. त्यामुळे मोबाईल धारकांना **21*, *401* असे क्रमांक सुरुवातील येऊन क्रमांक डाईल करण्यास लावल्यास ते करू नये असे आवाहन पोलिस खात्याने केले आहे. 
सायबर गुन्हेगार हे बँकेचे अधिकारी म्हणून मोबाईलधारकाला फोन करतात. ते बँकेचे सेवा देणारे असल्याचे सांगतात. त्यांची बोली मोबाईल धारकाला भूरळ पाडते व त्याला पाठविलेला क्रमांक डाईल करण्यास सांगतात. एकदा हा क्रमांक डाईल केला की सर्व कॉल्स 
या गुन्हेगाराच्या (बोगस बँक अधिकारी) मोबाईलवर वळविले जातात. त्यानंतर तो पासवर्ड विसरल्याचे नमूद आपल्या मोबाईलवर ओटीपी मागवून घेतो. एकदा ही ओटीपी मिळाल्यावर तो मोबाईल धारकाचा हा मोबाईल ज्या ठिकाणी जोडलेला असतो त्यावरील सर्व 
व्यवहार करतो. ही पद्धत सायबर गुन्हेगार सोशल मिडिया अकाऊंट पासवर्डच्या बाबतीतही करू शकतात. त्यामुळे मोबाईल धारकांनी 
सावधगिरी बाळगण्याबरोर असे कोणा अज्ञात व्यक्तीचे फोन आल्यास त्याची पडताळणी करा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  

 goa goa goa
 

संबंधित बातम्या