गोमंतकीयांनो सावध रहा!  राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 1500 हून अधिक रुग्णांची नोंद 

गोमंतकीयांनो सावध रहा!  राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 1500 हून अधिक रुग्णांची नोंद 
corona.jpg

पणजी : देशाबरोबरच गोव्यातही गेल्या काही दिवसांपासून मृत्यू होणाऱ्या कोरोना रुग्णांची व संसर्गाची संख्या वाढ असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. दिवसागणिक ही स्थिती भयावह होत असली तरी रुग्णांना सर्व उपचार वेळेत मिळण्यासाठी सरकारी पातळीवर मोठी धडपड सुरू आहे. आज दिवसभरात 17  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला तर 1502  रुग्ण कोरोना बाधित सापडले आहेत. कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यापासून झपाट्याने वाढत आहे.  (Be careful! More than 1500 patients registered in the state for the second day in a row) 

कालच्यापेक्षा कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना बांधित रुग्णांची संख्या दीड हजार पार झाली आहे. मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 943  वर पोचली हे प्रमाण असेच सुरू राहिल्यास येत्या काही दिवसांमध्ये हजाराचा टप्पा पार होण्यास वेळ लागणार नाही. सरकारने कोरोना चाचणीसाठी विविध यंत्रे आणली असल्याने एरवीही दिवसागणिक दीड हजार ते दोन हजार लोकांची चाचणी दिवसाला होत होती ती आता दुप्पटीने झाली आहे. आज दिवसभरात 4089  लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात 1502  जण कोरोना बाधित सापडले. त्यातील सुमारे 158 जणांना कोविड इस्पितळात इस्पितळात दाखल करण्यात आले असून 595  जणांनी गृह अलगीकरण पत्करले आहे. चाचणी करण्यात आलेल्यांची संख्या 6 लाखापेक्षा अधिक झाली आहे. गेल्या 24  तासामध्ये 426  रुग्ण बरे झाले हे प्रमाण खूपच कमी (85.53  टक्के) झाले आहे. सध्या राज्यात 9300   लोक कोरोना सक्रिय आहेत. उत्तर गोव्यातील कोविड उपचार केंद्रात 105  तर दक्षिण गोवा कोविड उपचार केंद्रात 50  कोरोना बाधित उपचार घेत आहेत.  

राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 17  मध्ये 11 पुरुष तर 6  महिलांचा समावेश आहे. त्यामध्ये 9  जणांचा गोमेकॉ इस्पितळ, ३ जणांचा हॉस्पिसिओ तर उत्तर गोवा व दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळामध्ये प्रत्येकी एकाची प्राणज्योत मालवली आहे. मृत्यू झालेले रुग्ण हे 27 ते 79  वर्षे वयोगटातील आहेत. गोमेकॉ इस्पितळातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिघे म्हापशातील व 2  कळंगुट येथील तसेच पणजी, सांत इस्तेव्ह, माशेल, काणकोण, कुंकळ्ळी, वास्को, वागातोर, बार्देश, मयडे, फोंडा येथील प्रत्येकी एकजण आहेत. 

राज्यातील विविध सरकारी आरोग्य केंद्रे, इस्पितळे तसेच काही खासगी इस्पितळात पहिल्या व दुसऱ्या कोविड लसीकरण देण्यात आले आहे. आतापर्यंत दोन्ही मिळून 2  लाख 64  हजार 663  लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये पहिला लसीकरण डोस 2 लाख 10618  जणांना तर दुसरा लसीकरण डोस 54  हजार 45  जणांना देण्यात आला आहे. आज दिवसभरात पेडणे, विर्डी, कुळे व केळशी या चार पंचायतीमध्ये ‘टिका उत्सव’ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये 728  जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. सार्वजनिक व खासगी इस्पितळामध्ये 5161 तसेच काल संध्याकाळी 6  वाजल्यानंतर लसीकरण घेतलेल्यांची संख्या 2118 आहे. त्यामुळे आज 24 तासात 8007  जणांनी लसीकरणाचा डोस घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com