देशाला व राज्याला भाजपशिवाय पर्याय नाही

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

कोणतीही व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नाही. पक्षच त्या व्यक्तीला मोठा करत असतो, आगामी कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत मग ती जिल्हा पंचायत, पालिका, पंचायत, विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक असू दे, या निवडणुकीत केवळ देशाला आणि राज्याला भाजपा शिवाय पर्याय नाही.

मोरजी :  कोणतीही व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नाही. पक्षच त्या व्यक्तीला मोठा करत असतो, आगामी कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत मग ती जिल्हा पंचायत, पालिका, पंचायत, विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक असू दे, या निवडणुकीत केवळ देशाला आणि राज्याला भाजपा शिवाय पर्याय नाही. भाजपच्या हातात देश आणि राज्य सुरक्षित आहे. त्यामुळे आगामीसर्व प्रकारच्या निवडणुकीत केवळ भाजप उमेदवार समर्थकांचाच विजय  करणे, ही प्रत्येक  भाजप कार्यकर्ते, मतदार आणि समर्थकांचे कर्तव्य आहे .

त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. ७ रोजी मांद्रे मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांच्या समर्थकांची कार्यशाळा दीनदयाळ सभागृह मांद्रे येथे आयोजित केली होती. त्यावेळी ते उद्‍घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी भाजपाचे महामंत्री सतीश धोंड, मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, महिला अध्यक्ष नयनी शेटगावकर आदी उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन सागर तिळवे यांनी केले. आमदार दयानंद सोपटे यांनी पुढे बोलताना मांद्रे मतदार संघात आणि पर्यायाने पेडणे तालुक्यात पूर्णपणे भाजापामय वातावरण करण्याची जबाबदारी प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांची आहे. भाजपच्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे मतदारांनी उभे राहून विजयी करण्याचे आवाहन केले. भाजपा असा एकमेव पक्ष आहे तो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेवून सोडवत असतो. जे पक्षातून फारकत घेतात,  भवितव्य धोक्यात येईल आहे. पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्याना जनताच धडा शिकवत असतात. मतदारसंघात आजही भाजपा पक्ष मजबूत असून गत निवडणुकीपेक्षा आता येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून भाजपाची ताकत वाढवून विकासाला गती देण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या