Goa Beach Wedding: गोव्यातील 'बीच वेडिंग' महागले; 'सीझेडएमए'कडून शुल्कवाढीचा निर्णय

तात्पुरते बांधकाम, परवान्यांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ
Goa Beach Wedding
Goa Beach WeddingDainik Gomantak

Goa Beach Marriage: लग्न ही बाब अनेकजण हौसेने मोठा खर्च करून साजरे करत असतात. त्यात पैशांपेक्षाही लग्न संस्मरणीय करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. त्यातूनच समुद्र किनाऱ्यांवर लग्न करण्याचा प्रयत्न अनेकजण निवडतात.

तथापि, आता गोव्यात समुद्र किनाऱ्यांवर लग्न करणाऱ्यांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीझेडएमए) ने याबाबत निर्णय घेतला आहे.

Goa Beach Wedding
Goa Corona: कोरोनायोद्धांना 3 वर्षानंतरही पगारवाढीचे पैसे नाही; मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन विरले हवेत

ऐन लग्नसराईच्या काळात हा निर्णय घेण्यात आल्याने आता इच्छुकांना स्वतःच्या लग्नाची ही हौस पुरविण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. सीझेडएमएने किनाऱ्यांवर लग्नासाठी तात्पुरते उभारण्यात येणाऱ्या बांधकामांसाठी तसेच परवान्यांसाठीच्या शुल्कात दुप्पट वाढ केली आहे.

बीच वेडिंग म्हणजेच किनाऱ्यावरील लग्नसोहळ्यासाठी तसेच किनाऱ्यांवरील इतर कार्यक्रमांसाठी पुर्वी प्रतिदिन 50 हजार रूपये शुल्क आकारले जात होते. आता हे शुल्क एक लाख रूपये शुल्क एका दिवसासाठी आकारले जाणार आहे.

प्राधिकरणाकडून शॅक्ससाठी आता प्रती चौरस मीटर 500 रूपये शुल्क आकारले जात होते. तथापि, नव्या दरांनुसार आता 1000 रूपये प्रती चौरस मीटर आकारले जाणार आहे. तर किनाऱ्यावर झोपडी आणि कॉटेजसाठी प्रती चौरसमीटर 100 रूपये दर पुर्वी होता आता तो दर 500 रूपये प्रती चौरस मीटर असणार आहे.

Goa Beach Wedding
Goa Traffic: अटल सेतूचा फोंड्याकडील भाग आज वाहतुकीसाठी खुला करणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

दरम्यान, शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमांसाठी मात्र 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तर सरकारी आणि विना नफा संस्थांना 50 टक्के सवलत दिली जाईल.

नवीन हॉटेल बांधकामासाठी 500 रूपये प्रतीचौरस मीटर दराच्या तुलनेत आता 1 हजार रूपये प्रती चौरस मीटर शुल्क आकारले जाईल.

लाकडी जेटी बांधण्यासाठी किंवा तरंगती जेटी उभारण्यासाठीचे शुल्क 1 लाख रूपये तर तात्पुरत्या जेटीसाठी दोन लाख रूपये शुल्क असणार आहे. रहिवाशांना संरक्षक भिंतीसाठी 25 हजार रूपये तर व्यावसायिकांना 50 हजार रूपये शुल्क द्यावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com