गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील शॅक्स सप्टेंबरपासून होणार सुरु

देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण असणारे गोव्यातील (Goa) समुद्र किनाऱ्यावरील शॅक्स आता 1 सप्टेंबर पासून सुरु होणार आहेत.
गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील शॅक्स सप्टेंबरपासून होणार सुरु
Goa Beaches Dainik Gomantak

मडगाव: देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण असणारे गोव्यातील (Goa) समुद्र किनाऱ्यावरील शॅक्स आता 1 सप्टेंबर पासून सुरु होणार आहेत. मात्र कोविडच्या (Covid19) पार्श्वभूमीवर किती व्यवसाय होणार याची शास्वती नसल्याने यावेळी सरकारने परवाना नूतनीकरण आणि अन्य शुल्क पूर्णतः माफ करावेत अशी मागणी शॅक्सवाल्यानी केली आहे.

Goa Beaches
Goa: अखेर त्या मुख्याध्यापिकेची बदली...

शॅक्स म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील झोपडीवजा रेस्टोरंट्स असून या शॅक्समध्ये बसून समुद्राचे दर्शन घेत बिअरचे घुटके घेत गोमंतकीय पध्दतीचे जेवण घ्यायला येथे पर्यटक आवर्जून येत असतात. हा शॅक व्यवसाय म्हणजे एक प्रकारचा उद्योगच असून गोव्यात समुद्र किनाऱ्यावर एकूण 365 शॅक्स असून त्याद्वारे किमान 5000 लोकांना रोजगार मिळतो. सप्टेंबर ते मे असे 9 महिने हा व्यवसाय चालू असतो.

Goa Beaches
Goa: विरोध असून देखील दुपदरी रेल्वेरुळांचे काम वेगात सुरु

गोवा शॅक मालक कल्याण संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्डोज यांनी यासंदर्भात बोलताना, कोविड आणि अन्य कारणासाठी मागची दोन वर्षे शॅकवाल्यांना फक्त तीन ते चार महिनेच धंदा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे बहुतेक शॅकवाले नुकसानीत असून मागच्या वर्षी काही जणांनी पैसे भरूनही पर्यटक नसल्याने आपले शॅक बंद ठेवणेच पसंत केले होते. त्यामुळे यंदा किमान अशा शॅकमालकांकडून तरी शुल्क घेऊ नये अशी विनंती आम्ही सरकारला केली आहे असे कार्डोज म्हणाले. मागच्या वर्षी सरकारने 50 टक्के शुल्क माफी या शॅकवाल्याना दिली होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com