पडलेला नारळ उचलला म्हणून भावजयीला मारहाण

सांकवाळची घटना; जखमींवर गोमेकॉत उपचार
Person arrested
Person arrested Dainik Gomantak

वास्को: सांकवाळ येथे राहणारे विश्वास रामा नाईक व त्याची पत्नी मानसा विश्वास नाईक यांनी आपली सख्खी भावजय श्रीमती दीक्षा देविदास नाईक हिचा भाटकाराच्या सार्वजनिक भाटातल्या जमिनीवर पडलेला नारळ उचलला या किरकोळ कारणावरून लाकडी दंडुक्याने नाका-तोंडावर प्रहार करून बेदम मारहाण केली. (Beaten to brother's wife )

Person arrested
धक्कादायक! कोलवाळ जेलचा सुरक्षारक्षकच ड्रग्जच्या धंद्यात

वेर्णा पोलिस स्थानकात श्रीमती दीक्षा देविदास नाईक यांनी तक्रार केल्यानंतर विश्वास नाईक याला अटक केल. व यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्याचप्रमाणे श्रीमती दीक्षा हिची अविवाहित मुलगी कु. दिप्ती नाईक हिने आपल्या आईला सोडवण्यासाठी हस्तक्षेप केल्याने विश्वासने आपल्या पुतणीलाही त्याच लाकडी दंडुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात दोघीही जखमी झाल्या. त्यांना गोमॅकोत उपचारासाठी पाठवण्यात आले.

वेर्णा पोलिसांनी आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा आपण महिला आयोगाकडे किंवा न्यायालयात न्याय मागण्यासाठी जाऊ, असा इशारा विश्वास याची विधवा भावजय श्रीमती दीक्षा देविदास नाईक हीने दिला आहे. विश्वास रामा नाईक यांस सांकवाळ गावातून तडीपार करावे, अशी मागणीही दीक्षा यांनी केली आहे. दीक्षा या वेर्णा येथील एका आस्थापनात हंगामी नोकरी करतात. त्यांनी आपल्याला योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणीही वेर्णा पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com