Mapusa News: गाडीला ओव्हरटेक केल्याच्या रागातून पर्यटकाला मारहाण!

आठवड्यातील दुसरी घटना : दोघांना अटक
Crime News |Goa Drugs News
Crime News |Goa Drugs NewsDainik Gomantak

Mapusa Drug Case: दिल्लीतील पर्यटक कुटुंबावर प्राणघातक हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच हणजूणमध्ये मुंबईमधील एका पर्यटकाला स्थानिकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी हणजूण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दुचाकीला पर्यटकाने ओव्हरटेक केल्याच्या रागातून संशयितांनी त्याला जबर मारहाण करीत त्याच्या कारची मोडतोड केली.

हा प्रकार 14 मार्च रोजी रात्री 10 च्या सुमारास घडला. याप्रकरणी विराज पार्सेकर (25), सिद्धांत खोर्जुवेकर (29, दोघेही रा. कामुर्ली) यांना अटक केली. दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Crime News |Goa Drugs News
Goa Crime News : ‘खंडणीराज’मुळे उत्तर गोवा हॉटेल व्यावसायिकांमध्ये दहशत, उच्चपदस्थांशी संधान?

कॅमेऱ्यामुळे पर्दाफाश

संशयित पल्सर दुचाकीवरून आले आणि त्यांनी पर्यटक ओंकार उपवणे (रा. कल्याण, मुंबई) यांची कार अडवून त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या डोक्यावर दगड व सिमेंटच्या विटांनी हल्ला केला.

यात ओंकार गंभीर जखमी झाले. यावेळी ओंकार यांच्यासोबत त्यांची मैत्रीण होती. संशयितांनी कारचीही मोडतोड केली. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com