Goa: मालमत्तेच्या वादातून पाच जणांना मारहाण

मालमत्तेच्या वादातून घटना, पंचासह दोघांना अटक
Goa: मालमत्तेच्या वादातून पाच जणांना मारहाण
Crime Dainik Gomantak

डिचोली: मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघासह पाचजणांना बेदम मारहाण करण्याची घटना तारवाडा-पिळगाव येथे घडली. मारहाण झालेल्यामध्ये दोन युवतींसह तीन महिलांचा समावेश आहे. आज पिळगाव युवक कला मंचच्या वाचनालयासमोर घडली. पाच जणांना बेदम मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी(police) या स्थानिक पंचसदस्य स्वप्नील फडते आणि त्यांचे बंधू मनोहर फडते यांंनी या दोघांही संशयितांना अटक केली आहे. मारहाणीत जखमी झालेल्यामध्ये माजी उपसरपंच संदेश गोवेकर यांचा समावेश आहे.

डिचोली पोलीस स्थानकात करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पिळगाव युवक कला मंचाच्या वाचनालयासमोर वाचनालयाचे असलेले दगड पंचसदस्य स्वप्नील फडते हे आपल्या कसल्यातरी कामाला वापरण्याची तयारी करीत असताना, श्रुष्टी सुनील पिळगावकर यांनी सदर दगड वापरण्यास हरकत घेतली. त्याचवेळी सदर ठिकाणी असलेल्या पंचसदस्य स्वप्नील फडते, मनोहर फडते व श्रुष्टी यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यावसान मारामारीत झाले.

Crime
Goa: बुद्धिबळपटू अमेय अवदीला राज्यपालांनी केले सन्मानित

बहिण श्रुष्टी हिला मारहाण करत असल्याचे पाहून समता पिळगावकर हिने घटनास्थळी धाव घेतली. समता हिलाही लोखंडी ट्युडच्या सहाय्याने मारण्यात आले. तसेच तिच्या केसांना धरून तिला जमिनीवर पाडण्यात आले. त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या त्यांची आई स्वेच्छा पिळगावकर यांनाही मारहाण करून तिचे कपडे फाडण्यात आले.

या घटनेचे चित्रिकरण करीत असलेल्या संदीप पिळगावकर यांंना व अडविण्यासाठी आलेल्या माजी उपसरपंच संदेश गोवेकर यांनाही वरील दोघाही संशयितांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली. लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे संदेश गोवेकर यांना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले असून, त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संदीप पिळगावकर यांच्यावर म्हापसा येथील इस्पितळात उपचार केल्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले. तसेच इतर जखमींवरही उपचार करून त्यांना घरी जाऊ देण्यात आले.

या प्रकरणी श्रुष्टी पिळगावकर हिने डिचोली पोलीस स्थानकात रितसर तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भा.द.सं. च्या (Act)323, 324, 354, 508, 506(2) रेड विथ 34 या कलमान्वये गुन्हा नोंंदवून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com