कोरोनामुळे जाईच्या फुलांची मागणी घटली

Ramesh Vaskar
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

कर्नाटकसारख्या राज्यात या फुलावर प्रक्रिया करून अत्तराची निर्मिती करण्यात येते. गोवा सरकारने पुष्प उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखली आहे. मात्र, येथील मातीचा गंध घेऊन फुलणाऱ्या या जाती पुष्पाच्या लागवडीसाठी कोणतेच अनुदान नाही, आधारभूत किंमत नाही. त्यामुळे ही फुले अबोल ठरली आहेत

काणकोण, काणकोण व राज्यात जाईच्या फुलांची (जाती पुष्प) करोना महामारीमुळे मागणी घटली आहे. एकमेव काणकोण तालुक्यात जुलै ते सप्टेंबरपर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीत या फुलांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत होती. श्रावण महिना ते गणेशचतुर्थीपर्यंत या फुलांना भरपूर मागणी असे. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे देवालयातील उत्सव व घरगुती सणसमारंभ बंद असल्याने या फुलांची मागणी घटली आहे.
श्रावण महिन्यात दोनशे रुपये प्रती हजार जाईच्या फुलांचा गजरा विकण्यात येत होता. आता शंभर रुपयांनाही तो विकला जात नाही. या काळात काही देवालयातून जाती पुष्प पुजेचे आयोजन होते. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यावरही निर्बंध आले आहेत. त्यामुळे या जाती पुष्प पुजा यंदा उपचार झाल्या आहेत. काणकोणमध्ये मोठ्या प्रमाणात जाई फुलांचे उत्पादन लोलये पंचायत क्षेत्रात होते, त्याशिवाय हल्लीच्या काळात गावडोंगरी, आमोणे या भागातही या फुलाचे उत्पादन घेतले जाते. पहाटे उठून फुले काढणे त्याचे गजरे तयार करून रस्त्यावर मोक्याच्या जागी त्याच्या विक्रीसाठी दिवसभर उभे राहणे यासाठी कष्ट हे उत्पादन घेत आहेत. मात्र, यंदा मागणी नसल्याने संध्याकाळी मिळेल त्या दरांत या फुलांची विक्री त्यांना करावी लागते. केरळ, कर्नाटकसारख्या राज्यात या फुलावर प्रक्रिया करून अत्तराची निर्मिती करण्यात येते. गोवा सरकारने पुष्प उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखली आहे. मात्र, येथील मातीचा गंध घेऊन फुलणाऱ्या या जाती पुष्पाच्या लागवडीसाठी कोणतेच अनुदान नाही, आधारभूत किंमत नाही. त्यामुळे ही फुले अबोल ठरली आहेत.
काणकोणात या फुलांच्या विक्रीतून किमान चार महिने सुमारे पाचशे कुंटुंबांचे पालन पोषण होते. परंतु यंदा या फुलांना भाव मिळाला नसल्याने या फुल विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला आहे.

संबंधित बातम्या