शुल्क वाढीमुळे मद्य महागणार

dainik gomantak
बुधवार, 13 मे 2020

यापूर्वी मद्यालयाचा परवाना सरसकट देण्यात येत होता. मात्र त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. मद्यालयांच्या चटईक्षेत्रानुसार यापुढे परवाना शुल्क आकारले जाणार आहे.

पणजी,

मद्यावरील अबकारी कर व मद्य व्यवसायासाठीच्या विविध शुल्कामध्ये वाढ करण्याचा आदेश आज गोवा सरकारने केली आहे. त्याची अंमलबजावणी येत्या १५ मे पासून सुरू करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या नवीन शुल्कामुळे सर्व प्रकारच्या मद्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ होणार आहे.
सरकारने काढलेल्या अधिसूचनेद्वारे अबकारी शुल्क, परवाना शुल्क, परवानगी शुल्क, आयात शुल्क, प्रक्रिया शुल्क, हस्तांतरण किंवा परवाना बदलण्यासाठीची शुल्क व लेबलच्या रेकॉर्डिंगसाठी शुल्क सुधारित दर जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी मद्यालयाचा परवाना सरसकट देण्यात येत होता. मात्र त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. मद्यालयांच्या चटईक्षेत्रानुसार यापुढे परवाना शुल्क आकारले जाणार आहे. या नवीन दराचा फटका मोठ्या मद्यालये असलेल्यांना होणार आहे. हा परवाना शुल्क आता असलेल्या शुल्कापेक्षा दुप्पट होऊ शकतो. या व्यतिरिक्त मद्याच्या पॅकेजिंगवर छापलेल्या एमआरपीनुसार अबकारी शुल्कातही बदल होईल.

 

संबंधित बातम्या