Beer To Get Costlier: स्वस्त आता विसरा, गोव्यात बिअर महागणार

प्रती लिटर बिअरमागे दहा ते बारा रूपये अधिक मोजावे लागणार
Beer To Get Costlier in Goa
Beer To Get Costlier in GoaDainik Gomantak

Beer To Get Costlier in Goa: गोव्यात स्वस्त मद्य मिळते म्हणून अनेक पर्यटक आणि जवळच्या राज्यातील लोक गोव्यात येत असतात. पण, आता गोव्यात देखील मद्य महाग होणार आहे. गोवा सरकारने बिअरवरील अबकारी करात 10 ते 12 रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोव्यात आता प्रती लिटर घाऊक बिअरमागे दहा रूपये अधिक मोजावे लागणार आहेत. (Beer Rate In Goa)

Beer To Get Costlier in Goa
Goa Job Scam: पोलीस भरतीत मोठा घोटाळा; विजय सरदेसाई

गोव्यात मद्याला अधिक मागणी आहे, येथील स्वस्त दरात मिळणाऱ्या मद्यामुळे अनेक पर्यटक राज्यात येत असतात. राज्य सरकाराला देखील यातून मोठे उत्पन्न मिळत असते. पण, गोव्यातील मद्याच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे संकेत यापूर्वीच मद्य उद्योगाने दिले होते. प्रारंभी घाऊक बिअरच्या खरेदीसाठी अबकारी कर 30 रूपये वरून 42 रूपये केल्याने तिथे 12 रूपयांची वाढ झाली आहे. (Goa Liquor Rate)

Beer To Get Costlier in Goa
Goa News: समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या माथेफिरू परप्रांतियास शिवप्रेमींनी शिकवला धडा

तसेच, प्रिमियम दर्जाची बिअर म्हणजेच पाच टक्के अल्कोहोल असलेली बिअरची रिटेल किंमत 160 प्रती बॉटल झाली आहे. याठिकाणी 60 रूपये कर लावण्यात आला असून, पूर्वी हा कर 50 रूपये एवढा होता. त्यामुळे येथे दहा रूपयांची वाढ ग्राहकांना सोसावी लागणार आहे. त्यामुळे बिअर दरवाढीचा फटका आता गोव्यात देखील तळीरामांना बसणार एवढं निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com