PM Modi Goa Visit: मोदींच्या दौऱ्यापूर्वी रातोरात बदलले लेन सेपरेटर, वेली झुडपांनी वेढलेला भागही झाला स्वच्छ

रात्रीच्या अंधारात कापून काढले जुने लेन सेप्रेटर
PM Modi Visit To Goa
PM Modi Visit To Goa Dainik Gomantak

VIP व्यक्तींचा दौरा असेल तर प्रशासन खडबडून जागे होते, त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Visit To Goa) यांच्यासारखी VVIP व्यक्ती राज्यात येणार असेल तर अधिक सुरक्षा आणि काळजी घेतली जाते. रविवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते गोव्यातील मोपा विमानतळसह इतर दोन विकासकामांचे उद्धाटन केले जाणार आहे. यापूर्वी गोव्यात विशेषत: पणजीत जय्यत तयारी सुरू आहे. याठिकाणी जागतिक आयुर्वेद काँग्रेसच्या समारोप कार्यक्रमाला मोदी संबोधित करणार आहेत.

PM Modi Visit To Goa
Mopa Airport: 2,870 कोटी रुपयांचे 'मोपा'; रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, असा असेल मोदींचा गोवा दौरा

काम्पाल येथे नववी जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद आणि प्रदर्शन सुरू आहे. याच्या सांगता संमारंभाला पंतप्रधान मोदी उपस्थिती लावणार आहेत. पणजीतून मिरामारला जाणाऱ्या रस्ताने मोदी प्रवास करतील. यासाठी या मार्गावर विशेष स्वच्छता आणि काळजी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मोदींच्या आगमनापूर्वी सगळं निटनेटके दिसावे यासाठी गोवा प्रशासनाने रातोरात रस्त्यातील जुने लेन सेपरेटर बदलून त्याठिकाणी नवे लेन सेपरेटर बसवले. शनिवारी मध्यरात्री अंधारात हे काम सुरू होते. अंधारात काम करणाऱ्य कर्मचाऱ्यांना विचारले असता ते हे काम मागील पाच दिवसांपासून सुरू असल्याचे म्हणाले.

Panjim
Panjim Dainik Gomantak
Panjim
Panjim Dainik Gomantak

मोठा ट्रक भरून जुने लेन सेपरेटर कापून काढण्यात आले. लेन सेपरेटर कापून काढण्यात आल्याने त्यांचा पुर्नवापर होणार नाही. याशिवाय या परिसरात अनेक ठिकाणी वेली, झाडे झुडपांनी वेढलेला भागही स्वच्छ करण्यात आला आहे.

PM Modi Visit To Goa
Mopa Airport Interior: 'मोपा'च्या अंतरंगात, पाहा विमानतळाच्या आतील फोटो

पणजीत रस्ते बंद अन् वाहतूक सुरू अशी अवस्था

पणजीत मागील अनेक दिवसांपासून रस्त्यांची विविध कामे सुरू आहेत. यामुळे मुख्य शहरातील अनेक ठिकाणी बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर रस्ते मध्यभागी खोदल्याने वाहतूक लांब चालणेही अवघड झाले आहे. पणजी मुख्यबाजरपेठेत यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. पणजीत अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांकडे प्रशासनाने असेच लक्ष घातल्यास नागरिकांची देखील उत्तम सोय होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com